शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

मूक सरकार आता बोलायला लागलंय

By admin | Updated: October 10, 2016 01:05 IST

पी. एन. पाटील : अल्पसंख्याक समितीची भेट

कोल्हापूर : महाराष्ट्रभर निघणाऱ्या मराठ्यांच्या मूक मोर्चांमुळे मराठा आरक्षण प्रश्नावर मूक झालेलं सरकार आता बोलायला लागलंय, अशी टीका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी केली. काँग्रेस अल्पसंख्याक पश्चिम महाराष्ट्र समितीच्या बैठकीवेळी ते बोलत होते. मराठ्यांनी जी ताकद दाखवली त्याच पद्धतीने आपल्या प्रश्नांसाठी मुस्लिमांनी ताकद दाखवावी, असे आवाहनही पाटील यांनी केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी अल्पसंख्याकाच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी विभागनिहाय ३० जणांच्या पाच समित्या केल्या असून माजी आमदार हाफिज धत्तुरे यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम महाराष्ट्र समिती नेमण्यात आली आहे. ही समिती कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून यानिमित्त काँग्रेस कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पी. एन. पाटील म्हणाले, ‘मुस्लिमांचे लाड करणारा पक्ष’ म्हणून आमच्यावर टीका झाली; परंतु कोणत्याही टीकेला भीक न घालता या समाजाच्या पाठीशी काँग्रेस ठामपणे राहिली आहे. यावेळी हाफिज धत्तुरे यांनी मुस्लिमांबाबतच्या सर्व योजनांचा आढावा घेऊन केवळ काँग्रेसच या समाजाचे भले करू शकते. शासनाच्या योजनांची माहिती घेऊन त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. आमदार सतेज पाटील म्हणाले, शादी खाना, दफनभूमी, शिष्यवृत्ती या सर्व प्रश्नांबाबत वेळोवेळी काँग्रेसने सत्तेत असताना सकारात्मक भूमिका घेत मोठा निधी दिला. मात्र, गेल्या दोन वर्षांत शिष्यवृत्तीचे पैसे मिळत नाहीत. मराठा समाजाला आरक्षणासाठी मुस्लिम समाजाने पाठिंबा दिला आहे. त्यानंतर कायदेशीर अभ्यास करून मुस्लिम समाजालाही आरक्षण मिळावे यासाठी काँग्रेस पक्ष सहकार्य करेल. आमच्यावर पंजाचा शिक्का असून भाजप जातीयवाद वाढवत असल्याचा आरोप अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष इर्शाद बंडवल यांनी केला. यावेळी नदीम मुजावर, प्रकाश सातपुते, पैगंबर शेख, अमिन शेख, झाकीर पठाण, कादर मलबारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)