शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांची स्वाक्षरी लंडनमध्ये झळकणार !

By admin | Updated: December 6, 2015 00:03 IST

ऐतिहासिक दस्तावेजाचा सन्मान : साताऱ्याच्या शाळेत ७ नोव्हेंबर १९०० रोजी केली होती सही

प्रदीप यादव / सातारा ७ नोव्हेंबर १९०० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा हायस्कूल (सध्याचे छ. प्रतापसिंह हायस्कूल)येथे प्रवेश घेतला. या ऐतिहासिक घटनेला आता ११५ वर्षे होत आहेत. प्रवेश घेतेवेळी आंबेडकरांनी मोडी लिपीमध्ये केलेली स्वाक्षरी १ हजार ११४ व्या क्रमांकावर शाळेच्या रजिस्टरला आजही पाहायला मिळते. ही नोंद आज अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. या स्वाक्षरीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा केवळ शाळाप्रवेशच झाला नाही, तर ती एक युगांतराची सुरुवात होती. ज्या स्वाक्षरीने डॉ. आंबेडकरांचा ज्ञानाच्या अवकाशामध्ये प्रवेश झाला होता, ती स्वाक्षरी आता केवळ साताऱ्यापुरती मर्यादित राहिली नसून, सातासमुद्रापार लंडनला निघाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये शिकत असताना ज्या बंगल्यात वास्तव्यास होते, ते निवासस्थान नुकतेच भारत सरकारने ताब्यात घेतले आहे. या निवासस्थानात संग्रहालय होणार असून, त्यामध्ये डॉ. आंबेडकरांची पहिली स्वाक्षरी झळकणार आहे. यासाठी गेली १३ वर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळाप्रवेश दिन सोहळ्याचे आयोजन करणारे सामाजिक, वैचारिक चळवळीतील कार्यकर्ते अरुण जावळे प्रयत्न करीत आहेत. या स्वाक्षरीने बाबासाहेबांनी प्राथमिक शिक्षणाचा पाया साताऱ्यात भक्कम करून पुढे ते यशस्वीपणे शिकत राहिले. विदेशातल्या विद्यापीठांमध्ये आपल्या ज्ञानाचा अमीट ठसा उमटविला. जगद्विख्यात झाले. म्हणूनच ‘नॉलेज आॅफ सिम्बॉल’ ठरलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या स्वाक्षरीला एक आगळंवेगळंं महत्त्व आहे. भारत सरकारने डॉ. आंबेडकरांच्या शतकोत्तरी रौप्यमहोत्सवी जयंती निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देण्याबरोबरच त्यांच्या प्रत्येक स्मृती जतन करण्याचे धोरण अवलंबले आहे. सातारच्या मातीमध्ये डॉ. आंबेडकरांसारखा युगपुरुष शिकला, बागडला. याच मातीमध्ये त्यांनी वास्तव्य केले. या घटना सातारकरांचे ऊर भरून आणणाऱ्या अशाच आहेत. डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाला आणि या स्वाक्षरीलाही आपण सलामच करायला हवा, असे मत अरुण जावळे यांनी व्यक्त केले. हा तर साताराभूमीचा गौरव आता या स्वाक्षरीला जागतिक अशा स्वरूपाचे महत्त्व प्राप्त होणार असून, जगभरातील आंबेडकर अनुयायांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शाळाप्रवेशाच्या दरम्यानची स्वाक्षरी लंडन येथे पाहावयास मिळणार आहे. एका अर्थाने हा सातारच्या भूमीचा, भीमाईभूमीचा गौरव आहेच; परंतु प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटावा अशा पद्धतीचे कार्यकर्तृत्व उभे करणाऱ्या महामानवाचाही अभिमान वाटणार आहे. ज्यांनी या देशाचं संविधान निर्माण केलं, या देशाला संहिता दिली, नव्हे तर त्या संहितेमुळे जगाच्या पाठीवर सर्वोत्तम अशी लोकशाही प्रणाली निर्माण केली, अशा संविधान शिल्पकाराच्या स्वाक्षरीला म्हणूनच अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.