शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

सकाळी शुकशुकाट, दुपारनंतर रांगाच रांगा

By admin | Updated: November 2, 2015 00:42 IST

शांततेत मतदान : एस्तेर पॅटन केंद्रावर निर्धारित वेळेनंतरही २५० जणांचे मतदान

कोल्हापूर : सकाळपासून तुरळक गर्दी, शुकशुकाट; पण सायंकाळी गर्दीने मतदारांच्या रांगा असे दिवसभराचे चित्र नागाळा पार्क विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या अकरा प्रभागांत दिसत होते. शेवटच्या तासाभरात मात्र मतदारांना केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी उमेदवारांची आणि कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती. एकंदर या अकरा प्रभागांत शांततेत मतदान झाले असले तरीही पैशांचा महापूर वाहिला होता. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. त्याच वेळी प्रत्येक मतदान केंद्राबाहेर मतदारांना स्लिप देण्यासाठी टेबलांची मांडणी करण्यात कार्यकर्ते मग्न होते. त्यानंतर सकाळी आठ वाजल्यानंतर उमेदवारांची सर्व यंत्रणा सज्ज झाली. सर्व उमेदवार सहकुटुंब मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदारांना आपल्यालाच मत देण्याचे आवाहन करीत होते. प्रत्येक मतदान केंद्रावर सकाळी तुरळक गर्दी, दुपारी शुकशुकाट, तर शेवटच्या दोन तासांत रांगा लागल्या. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत सर्वच भागांत २५ टक्के मतदान झाले होते; तर त्याच वेळी बिंदू चौक आणि ट्रेझरी या दोन प्रभागांत मतदारांची गर्दी होती. यावेळी तेथे सुमारे ५० टक्के मतदान झाले होते. या दोन्हीही प्रभागांत चुरशीची लढत असल्याने येथे मतदानाची टक्केवारी वाढणार, हे निश्चितच होते. कॉमर्स कॉलेज प्रभागात मात्र अत्यंत मंदगतीने मतदान सुरू होते. येथे मतदान केंद्रावर तुरळक गर्दी होती. दुपारी चार वाजेपर्यंत येथे फक्त ४५ ते ५० टक्केच मतदान झाले होते. कनाननगर प्रभागात तीन माजी नगरसेवकांत चुरस असल्याने त्या प्रभागातील मतदान दुपारपर्यंत संथपणे सुरू होते. दुपारनंतर झोपडपट्टीतील मतदार गर्दीने बाहेर पडल्याने मतदान केंद्रावर तुडुंब गर्दी झाली. अक्षरश: एस्तर पॅटन या शाळेवरील मतदार केंद्रावर मतदारांच्या लांबच्या-लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे मतदानाची वेळ संपली तरीही सुमारे १०० हून अधिक पुरुष आणि १५० पेक्षा अधिक महिलांच्या रांगा लागल्या होत्या. त्यांना वेळ संपल्यानंतर चिठ्ठ्या देऊन रांगेत उभे केले. त्यानंतर आलेल्या मतदारांना मताचा अधिकार दिला नाही. त्यामुळे रात्री आठ वाजता या मतदान केंद्रावर मतदान पूर्ण झाले. (प्रतिनिधी) पतंग उडवीत होते.... कनाननगर प्रभागात कमालीची चुरस होती. याचे मतदान केंद्र हे एस्तेर पॅटन शाळेत होते. यातील एका उमेदवाराचे निवडणूक चिन्ह हे पतंग होते. त्यामुळे याच शाळेच्या मैदानावर, परिसरात सुमारे १० ते १२ कार्यकर्ते दिवसभर पतंग उडवीत होते. त्यामुळे हवेत आकाशात काही उंचीवरच अनेक पतंग उडताना दिसत होते; पण त्यावर कोणालाही आक्षेप घेण्यात अडचण होती. साडेपाच नंतर मात्र हे सर्व पतंग गायब झाले. पैशांचा महापूर प्रत्येक प्रभागात पक्षांच्या उमेदवारांकडून पैशांचा महापूर सोडला जात होता. उमेदवारांकडून पैसे घेऊन मतदान करणाऱ्यांची संख्या अधिक होती. अनेक मतदान केंद्रांनजीकच उमेदवारांचे समर्थक पैसे मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी धावाधाव करीत होते. त्यामुळे अनेक मतदारांंनी सर्वच उमेदवारांकडून पैसे घेऊन आपल्या पसंतीने मतदान केल्याचे दिसून आले.