शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

थेट पाईपलाईनप्रश्नी पुराव्यानिशी त्रुटी दाखवा

By admin | Updated: May 31, 2017 00:57 IST

आयुक्त : खुलासे असमाधानकारक आल्यास कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क --कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेतील वादग्रस्त लोखंडी पुलाची चौकशी न करता त्याच्या जादा बिलाच्या प्रस्तावावर सही केल्याप्रकरणी उपायुक्त विजय खोराटे यांच्यासह चार अधिकाऱ्यांचा समाधानकारक खुलासा न आल्यास त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचा इशारा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. दरम्यान, या योजनेतील त्रुटी पुराव्यानिशी दाखवून दिल्यास त्यांची निश्चितच चौकशी करून कारवाई करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.थेट पाईपलाईन योजनेवर भ्रष्टाचाराचे आरोप आणि निकृष्ट दर्जाचे काम या अनुषंगाने महापालिकेचने बजावलेल्या ‘शो कॉज’ नोटिसीला युनिटी सल्लागार कंपनीच्या व्यवस्थापकाने दिलेला लेखी खुलासा जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांच्याकडे दिलेला आहे; पण अद्याप तो आयुक्तांकडे पोहोचलेला नाही. त्या अनुषंगाने आयुक्त डॉ. चौधरी म्हणाले, युनिटी सल्लागार कंपनीने यापूर्वीच ठिकपुर्ली (ता. राधानगरी) येथील कामाचे जादा बिल आकारणी केल्याचे मान्य केले आहे. या योजनेतील आतापर्यंत सुमारे दहा टप्प्यांत एकूण १७० कोटी रुपयांची बिले देण्यात आलेली आहेत; पण ठिकपुर्ली येथील लोखंडी पुलाचा खर्च आणि आकारणी केलेले बिल यामध्ये सुमारे १ कोटी ४८ लाख रुपयांचे जादा बिल देण्यात आले आहे. मात्र हा प्रकार लवकर लक्षात आल्यामुळे महापालिकेचे यात आता तसे नुकसान होणार नाही. ही जादा दिलेली रक्कम पुढील बिलातून वजावट करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या लोखंडी पुलाबाबत कोणतीही चौकशी न करता जादा बिलाच्या प्रस्तावावर सही केल्याबद्दल उपायुक्तविजय खोराटे, जलअभियंता सुरेश कुलकर्णी, शाखा अभियंता हेमंत गोंगाणे, महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक धनंजय आंधळे यांना यापूर्वीच नोटीस बजावली होती. यांपैकी दोन अधिकाऱ्यांचे खुलासे आलेले आहेत; पण चौघांचे एकत्रित खुलासे पाहून ते समाधानकारक नसतील तर त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. चौधरी यांनी दिली.स्टील दराबाबत ठोस पुरावे द्याया योजनेसाठी वापरणात येणाऱ्या स्टील (सळई)चा दर सल्लागार कंपनीने बाजारभावापेक्षा कितीतरी जादा अपेक्षित धरला आहे. त्याबाबत पुराव्यानिशी ठोस तक्रारी दिल्यास त्याबाबतही चौकशी करून कारवाई करणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.गैरसमज दूर करुथेट पाईपलाईन पाणी योजना ज्या मार्गावरून येते तेथील पाच गावांनी पाईपलाईन टाकण्यास विरोध केला आहे. त्यापैकी राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वर या गावास मंगळवारी उपायुक्त विजय खोराटे यांनी अधिकाऱ्यासह भेट देऊन तेथील ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यामुळे या ग्रामस्थांचे गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आयुक्त डॉ. चौधरी यांनी सांगितले.