शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

कुरुंदवाडमधील दुकानगाळे वादात

By admin | Updated: September 23, 2016 00:37 IST

जिल्हा परिषदेची जागा असल्याचा आरोप : बांधकाम हटविण्याची नगरपालिकेला नोटीस; गाळेधारक ‘आंदोलन अंकुश’च्या रडारवर

गणपती कोळी-- कुरुंदवाडयेथील माळभागावरील जिल्हा परिषद हद्दीत नगरपालिका शहरातील व्यावसायिकांना दुकानगाळे बांधून देत आहे. मात्र, पालिका व्यावसायिकांना बेकायदेशीर दुकानगाळे बांधून देत असल्याने ‘आंदोलन अंकुश’ने चौकशीचा ससेमीरा लावला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागाने बेकायदेशीर बांधकाम हटविण्याची नोटीस नगरपालिकेला दिल्याने गाळेधारकांचे धाबे दणाणले असून, गाळेधारक आता आंदोलन अंकुशच्या रडारवर आहेत. तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर गाळेधारकांचा प्रश्न गंभीर बनणार असल्याने राजकीय नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.नगरपालिकेची निवडणूक तोंडावर आल्याने नगरसेवक, आघाडी नेते शहरवासीयांना खूश करण्यासाठी व राजकीय लाभ उठविण्यासाठी विविध निर्णय घेत आहेत. शहरवासीय मागेल तो ठराव कायदेशीर बाबींचा विचार न करता पालिका सभेत मंजूर करत आहेत. शहरातील छोटे व्यावसायिक व चर्मकार समाजाने पालिकेकडे दुकानगाळ्यांची मागणी केली होती. त्यानुसार माळभागावरील एस.पी. हायस्कूललगत असलेली जागा देण्याचा ठराव जुलै महिन्याच्या विशेष सभेत करण्यात आला.मात्र, दुकानगाळ्यांसाठी देण्यात आलेली जागा मुळात जिल्हा परिषद हद्दीत येते. त्यामुळे तेथील जागा व्यावसायिकांना न देता पालिका हद्दीत देण्याची मागणी पालिकेतील राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद सुरेश कडाळे यांनी केली होती. त्यावेळी या विषयावरून खडाजंगी होऊन बहुमताच्या जोरावर व्यावसायिकांना त्याच ठिकाणी जागा देण्याचा ठराव केला होता. त्यानुसार गेल्या पंधरा दिवसांपासून दुकानगाळे उभारण्याचे काम चालू असून, ते पूर्णत्वासही आले आहे.सध्या या जागेत ८ बाय ६ आकाराचे ३० दुकानगाळे उभारण्यात आले असून, सामाजिक कार्यकर्ते गोपाळ चव्हाण यांनी जिल्हा परिषद हद्दीत नगरपालिकेने दुकानगाळे बांधल्याने ‘आंदोलन अंकुश’ला सोबत घेऊन चौकशी लावली आहे. आंदोलन अंकुश ही सामाजिक संघटना असून, एखादा विषय घेतला तर त्याची पूर्ण निर्गत लावल्याशिवाय शांत होत नाही. शिवाय कोणत्याही आमिषाला बळी न पडणारी संघटना अशी प्रतिमा निर्माण केल्याने अधिकारी, लोकप्रतिनिधींमध्ये या संघटनेचा मोठा दबदबा आहे.गाळेधारकांचा प्रश्न गंभीर बनणार‘आंदोलन अंकुश’ संघटनेने या बेकायदेशीर कामाची चौकशी लावल्याने जिल्हा परिषद बांधकाम विभागाने नगरपालिकेला लेखी नोटीस देऊन जिल्हा परिषद हद्दीत बांधलेले दुकानगाळे काढून घेण्यास सांगितल्याने गाळेधारकांत खळबळ उडाली आहे. पालिका निवडणूक कधीही जाहीर होणार असल्याने निवडणुकीच्या तोंडावरच गाळेधारकांचा प्रश्न गंभीर बनणार असल्याने नगरसेवक, आघाडी नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.