शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

शिवसेना, ‘स्वाभिमानी’ची भूमिका निर्णायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2017 00:45 IST

जिल्हा परिषदेचे सत्ताकारण : अध्यक्षपद खुले असल्याने काँग्रेसमध्येही अंतर्गत राजकारण उफाळणार

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा गुलाल लागण्यास काही तासच शिल्लक राहिले असताना मतदानानंतर जे संभाव्य चित्र पुुढे आले आहे, त्यानुसार शिवसेना व ‘स्वाभिमानी’ची भूमिका सत्ता ठरविण्यात निर्णायक राहील, असे दिसत आहे. काँग्रेस सर्वाधिक जागा मिळवून पुढे राहू शकतो तसे झाल्यास अध्यक्षपदावरून अंतर्गत राजकारण उफाळू शकते. पहिल्या अडीच वर्षांतील अध्यक्षपद खुले आहे.मंगळवारी मतदान झाल्यानंतर नेत्यांसह कार्यकर्त्यांचाही बुधवारचा दिवस आकडेमोड करण्यात गेला. कोणत्या गावात कुणी मदत केली व कोण विरोधात गेले यासंबंधीच्या बेरीज-वजाबाक्या सुरू राहिल्या. मतमोजणीची व्यवस्था करण्यातही यंत्रणा व्यस्त राहिली. आता जे संभाव्य चित्र पुढे आले आहे, त्यानुसार शिवसेना व स्वाभिमानीच्या हातात सत्ता कुणाची आणायची याच्या चाव्या राहतील, असे दिसते. शिवसेनेतही अंतर्गत गटबाजी जास्त आहे. आमदार चंद्रदीप नरके यांना काँग्रेससोबत त्यातही पी. एन. यांच्यासोबत जाण्यात अडचणी आहेत. आमदार प्रकाश आबिटकर व डॉ. सुजित मिणचेकर यांना तशी फारशी अडचण नाही. आमदार सत्यजित पाटील हे जनसुराज्य व भाजपच्या विरोधातच लढले असल्याने ते देखील काँग्रेसला पाठिंबा देऊ शकतील. आमदार उल्हास पाटील हे भाजपसोबतच होते. सहसंपर्क प्रमुख संजय मंडलिक यांना गेल्यावेळी आमदार सतेज पाटील यांनीच अध्यक्ष केले असल्यामुळे व लोकसभेला त्या दोघांचाही राजकीय शत्रू समान असल्यामुळे ते देखील काँग्रेससोबत राहतील. मुंबईत शिवसेनेला काही जागा कमी पडल्या तर तिथे पाठिंबा देऊन कोल्हापुरात व इतरत्रही भाजपला पाठिंबा देण्याचा पर्याय आहे; परंतु शिवसेना त्यास कितपत तयार होते हा प्रश्नच आहे. कारण कल्याण-डोंबिवली निवडणुकीत शिवसेनेने भाजपची मदत घेतली; परंतु कोल्हापुरात मात्र शिवसेना भाजपसोबत गेली नाही. त्यामुळे शिवसेना यावेळेलाही भाजपला मदत करणार नाही, असेच भाजपलाही वाटते. तीच स्थिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीत अमर व राहुल पाटील राहणार पुढे...काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी चारच नावे स्पर्धेत आहेत. त्यामध्ये राहुल पाटील, संदीप नरके, महेश नरसिंगराव पाटील आणि अमर यशवंत पाटील यांचा समावेश आहे. त्यातील राहुल हा पी. एन. पाटील यांचा मुलगा आहे. तो एकदमच नवखा आहे. तीच स्थिती संदीप नरके यांची आहे शिवाय संदीप हा तसा काँग्रेसचा सक्रिय कार्यकर्ता नाही. महेश पाटील हे मावळत्या सभागृहात शिक्षण सभापती होते. ते अभ्यासू असले तरी मवाळ आहेत. अमर पाटील हे जिल्हा परिषदेत चौथ्यांदा निवडून येत आहेत. त्यांनी यापूर्वी पंचायत समिती व जिल्हा परिषदेतही काम केले आहे. त्यांचे वडील यशवंत एकनाथ पाटील हे उपाध्यक्ष होते. सगळ््यात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या नावाला पी. एन. पाटील व सतेज पाटील यांच्याकडूनही पाठबळ मिळू शकते. नरके कुटुंबीयांचेही ते जवळचे पाहुणे आहेत. यशवंत एकनाथ पाटील यांनी विनय कोरे यांच्या विरोधात सन २००४ ची विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढविली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीलाही हे नाव चालू शकते. पी. एन. हे काँग्रेसचे निष्ठावंत आणि पक्षात दबदबा असलेले नेते आहेत. त्यांनी मुलासाठी आग्रह धरला तर त्याचा पक्षालाही विचार करावा लागेल. काँग्रेसअंतर्गत ते स्वत:च्या म्हणून किती जागा निवडून आणतात त्यावर त्यांच्या मुलाची दावेदारी निश्चित होऊ शकेल.