शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठाचे आज ‘बजेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:24 IST

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाची अधिसभा (सिनेट) आज, बुधवारी दुपारी बारा वाजता विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहामध्ये होणार आहे. त्यात ...

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाची अधिसभा (सिनेट) आज, बुधवारी दुपारी बारा वाजता विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहामध्ये होणार आहे. त्यात सन २०२१-२२ या आर्थिक वर्षांमधील सुमारे ५१० कोटींच्या अंदाजपत्रकाचे (बजेट) सादरीकरण होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे बजेट सादर होणार असल्याने त्याकडे विद्यापीठाच्या घटकांचे लक्ष लागले आहे.

गेल्यावर्षी विद्यापीठाने ४५५ कोटी ९० लाख रुपयांचे अंदाजपत्रक अधिसभेने मंजूर केले होते. या अंदाजपत्रकातील ९ कोटी ९६ लाख रुपये इतकी तूट ही विद्यापीठ निधीतील शिलकीतून भरून काढली होती. पेटंटसाठीचा खर्च, दिव्यांग विद्यार्थ्यांना मदत आदींसाठी त्यामधून तरतूद करण्यात आली होती.

डॉ. डी. टी. शिर्के हे त्यांच्या कुलगुरू पदाच्या कारकीर्दीतील पहिले बजेट बुधवारी अधिसभेसमोर सादर करणार आहेत. सुमारे ५१० कोटींचे हे बजेट असणार आहे. दरम्यान, अधिसभेतील प्रश्नोत्तराचा तास झाल्यानंतर बजेट सादरीकरण होईल. त्यातील मुद्द्यांबरोबरच पेपरफुटी प्रकरण, ठरावांची अंमलबजावणी, किती महाविद्यालयांना बी. व्होक. पदवी अभ्यासक्रमांना मिळालेली मान्यता, गेल्या पाच वर्षांत सादर झालेले एम. फिल्‌.. पीएच.डी.चे प्रबंध, अधिसंख्य पदांचा मुद्दा, कोरोनाच्या काळात विद्यापीठ प्रशासनाने घेतलेले निर्णय, तक्रार निवारण समितीने केलेली कार्यवाही, आदींबाबत चर्चा रंगणार आहे.

दरम्यान, विद्यापीठ शिक्षक संघाचे (सुटा) काही प्रश्न स्वीकारण्यात आले असून काही नाकारले असल्याचे सदस्य डॉ. अरुण पाटील यांनी सांगितले.