शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

माणगाव परिषदेवर शिवाजी विद्यापीठ देशी-विदेशी भाषेत ग्रंथ निर्मिती करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:22 IST

कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पाक्षिक मूकनायकमधील ऐतिहासिक माणगांव परिषदेतील भाषण, छत्रपती शाहू महाराज यांचे भाषण व ...

कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पाक्षिक मूकनायकमधील ऐतिहासिक माणगांव परिषदेतील भाषण, छत्रपती शाहू महाराज यांचे भाषण व त्या परिषदेतील पारित झालेले पंधरा ठराव यांचे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्यामार्फत देशी व परदेशी भाषेत अनुवाद करून हा ऐतिहासिक दस्तऐवज या शताब्दी वर्षानिमित्त जगभरातील विचावंत आणि अभ्यासकांना ग्रंथ रूपाने निर्मिती करून उपलब्ध करून दिला जाईल, अशी घोषणा शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांनी केली.

माणगाव परिषदेच्या १०१ व्या शताब्दी निमित्ताने सन्मान भूमी माणगांव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शाहू महाराज यांना शिवाजी विद्यापीठातर्फे शनिवारी अभिवादन करण्यात आले. माणगांव परिषद राष्ट्रीय स्मारक समितीचे अनिल कांबळे माणगांवकर यांनी शिवाजी विद्यापीठाने पाक्षिक मूकनायकमधील ऐतिहासिक माणगांव परिषद संबंधित वृत्तांत, भाषणे, ठराव यांचे विद्यापीठातील हिंदी, इंग्रजी व परदेशी भाषा विभागांनी अनुवाद करून शताब्दी वर्षात जगभरातील विचारवंत व अभ्यासकांना उपलब्ध करून द्यावे अशी मागणी कुलगुरुंकडे केली. याचा संदर्भ देत कुलगुरु शिर्के यांनी ग्रंथ निर्मितीची घोषणा केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी शताब्दी वर्षानिमित्ताने विद्यापीठाने चर्चासत्र, व्याख्यानांचे आयोजन केल्याचे सांगितले.

यावेळी उपस्थित सर्वांनी स्मारक, लंडन हाऊस, होलोग्राफीक शो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुक्कामाने पुनीत झालेली कागल जहागिरीतील शाळा इमारत यांना भेट देऊन पाहणी करून समाधान व्यक्त केले . या कार्यक्रमास प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. डी. नांदवडेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे डॉ. एस. एस. महाजन, जनसंपर्क अधिकारी डॉ. अलोक जत्राटकर, बौध्द समाजाचे अध्यक्ष अरुण शिंगे, शिरीष मधाळे, नाना बिराजे, भिकाजी शिंगे, श्रीकांत चव्हाण, पांडुरंग कांबळे, भीमराव कांबळे, सुधाकर कांबळे, योगेश सनदी आदी उपस्थित होते. आभार नंदकुमार शिंगे यांनी मानले.

फोटो: २००३२०२१-कोल-माणगाव विद्यापीठ

फोटोओळ : माणगाव परिषदेच्या १०१ व्या शताब्दी निमित्ताने शनिवारी माणगाव (ता. हातकणंगले) येथे छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिवाजी विद्यापीठातर्फे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांनी अभिवादन केले.