शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शिवचरित्राचा सूक्ष्म अभ्यास ‘शिवाजी द ग्रेट’मध्ये

By admin | Updated: September 23, 2016 00:55 IST

इंद्रजित सावंत यांचे मत : उद्या होणार प्रकाशन समारंभ

कोल्हापूर : मुलतान, पंजाबसारख्या दूरच्या प्रदेशातून आलेल्या व लंडन विद्यापीठातून पीएच.डी. केलेल्या डॉ. बाळकृष्ण यांनी लिहिलेला ‘शिवाजी द ग्रेट’ हा ग्रंथ म्हणजे शिवाजी महाराजांच्या आयुष्याचा सूक्ष्म अभ्यास आहे, असे मत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी गुरुवारी राजर्षी शाहू स्मारक भवन येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केले. सह्याद्री इतिहास संशोधन केंद्राने पुनर्संपादित केलेल्या पाच खंडांमधील या नव्या स्वरूपातील ग्रंथाचे प्रकाशन शनिवारी (दि. २४) सायंकाळी साडेपाच वाजता केशवराव भोसले नाट्यगृहात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी इतिहास अभ्यासक डॉ. वसंतराव मोरे असतील. यावेळी आमदार सतेज पाटील, आमदार नीतेश राणे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत हेळवी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.राजाराम महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. बाळकृष्ण लिखित ‘शिवाजी द ग्रेट’ या शिवचरित्राच्या पुनर्संपादनाचे काम पूर्ण झाले आहे. मुलतान-पंजाबमधील आर्य समाजिस्ट डॉ. बाळकृष्ण यांनी सन १९३२ ते १९४० च्या दरम्यान शककर्ते शिवरायांचे चरित्र ‘शिवाजी द ग्रेट’ या नावाने चार खंडांत प्रसिद्ध केले होते. मात्र, दुर्दैवाने काळाच्या ओघात हे महान शिवचरित्र विस्मरणात गेले होते. ते पुन्हा एकदा लोकांसमोर आणण्याचे काम सह्याद्री इतिहास संशोधन केंद्राने केले आहे. जगभरातून ‘शिवाजी द ग्रेट’च्या प्रती मिळविल्या. त्यातून नव्याने १६८० पानांच्या पाच खंडांच्या या ग्रंथाच्या पुनर्संपादनाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. बाळकृष्ण यांचे विस्मरण छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र इंग्रजीमध्ये फारसे उपलब्ध नाही. डॉ. बाळकृष्ण यांनी मात्र १९३२ साली ते लिहिले. त्याकाळी छपाईतंत्र विकसित झाले नसल्याने त्यांनी पोर्तुगाल, डच येथून लेखनछपाईचे साहित्य मागविले. महाराजांचा इतिहास ज्या-ज्या ठिकाणी घडला, तेथे प्रत्यक्ष जाऊन त्यांनी ते लिहिले. त्यात त्यांनी शहाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांचे आदराचे स्थान विशद केले आहे. मात्र, हे ग्रंथ कालौघात विस्मरणात गेले. ते उपलब्ध झाले असते तर जेम्स लेन प्रकरण घडले नसते. विद्यापीठाची स्थापना, बी. टी. कॉलेज, लॉ कॉलेजची संकल्पना डॉ. बाळकृष्ण यांचीच. कोल्हापूरच्या शैक्षणिक चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या बाळकृष्ण यांचा कोल्हापूरकरांना मात्र विसर पडला आहे.