शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

रायगडावरील राजसदरेवर शिवभक्तांना प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:27 IST

रोपवे अप्पर स्टेशन ते होळीचा माळ या फरसबंद मार्गाची पाहणी केल्यानंतर हत्ती खान्याजवळ प्राधिकरणाचे कंत्राटदार, अधिकारी, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी, ...

रोपवे अप्पर स्टेशन ते होळीचा माळ या फरसबंद मार्गाची पाहणी केल्यानंतर हत्ती खान्याजवळ प्राधिकरणाचे कंत्राटदार, अधिकारी, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी, प्रांताधिकारी, महावितरण, बांधकाम विभाग आणि एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन खासदार संभाजीराजे यांनी कामांची माहिती घेतली. सध्या सुरू असलेली कामे एप्रिलअखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. राजसदरेवर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केल्यानंतर या सदरेवरील बॅरिकेड्‌सचा विषय चर्चेस आला. त्यावर उपस्थित पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तत्काळ निर्णय घेत सदरेवरील बॅरिकेडस् हटवून शिवभक्तांना राजसदरेवर प्रवेश खुला केला. त्यावर उपस्थित शिवभक्तांनी जयघोष केला. गडावर प्राधिकरण व पुरातत्त्व विभागामार्फत सुरू असलेल्या जगदीश्वर मंदिराच्या डाव्या बाजूला होत असलेल्या उत्खनन जागांची खासदार संभाजीराजे यांनी माहिती घेतली. जगदीश्वर मंदिर फरसबंदीची, भूमिगत इलेक्ट्रिकल केबलचे काम, हत्ती तलाव, पायरीमार्ग कामाची पाहणी केली.

चौकट

राजसदरेवर येताना शिष्टाचार पाळा

शिवभक्तांनी राजसदरेवर येताना शिष्टाचाराचे पालन करावे. या सदरेवर डाव्या बाजूने यावे आणि उजवीकडून उतरावे. तख्ताच्या जागेवर जाऊ नये. सेल्फी घेऊ नये. शांतता पाळावी, असे आवाहन खासदार संभाजीराजे यांनी केले. तूर्तास हे बॅरिकेड्‌स् तख्ताच्या बाजूने लावले असून लवकरच याऐवजी ऐतिहासिक धाटणीची संरचना करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

फोटो (२३०२२०२१-कोल-संभाजीराजे रायगड पाहणी) : रायगड विकास प्राधिकरणाअंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी मंगळवारी खासदार संभाजीराजे यांनी रायगडाला भेट दिली.

फोटो (२३०२२०२१-कोल-संभाजीराजे रायगड पाहणी ०१) : रायगड विकास प्राधिकरणाअंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी मंगळवारी खासदार संभाजीराजे यांनी रायगडाला भेट दिली. यावेळी शिवभक्त उपस्थित होते.