शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना भाजपला ‘टाळी’ देण्याची शक्यता धूसर

By admin | Updated: March 4, 2017 00:56 IST

जिल्हा परिषद सत्ताकारण : जिल्हाप्रमुखांचा अहवाल सादर

कोल्हापूर : ज्या पद्धतीने भाजपने कोल्हापूर जिल्ह्यात अतिशय आक्रमकपणे अन्य पक्षांतील मान्यवरांना घेत काँग्रेसच्या बरोबरीने जागा मिळविल्या ते पाहता शिवसेना जिल्हा परिषदेच्या राजकारणामध्ये भाजपला ‘टाळी’ देण्याची शक्यता धूसर झाल्याचे मानले जाते. गुरुवारच्या उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावेळचेही एकूण वातावरण आणि अहवालाचा सारांश भाजपविरोधीच असल्याचे समजते. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सत्ताकारणामध्ये काँग्रेस आणि भाजप प्रत्येकी १४ जागा मिळवून अग्रभागी आहेत, तर ११ जागा मिळवून राष्ट्रवादी दुसऱ्या व १० जागा मिळवत शिवसेना तिसऱ्या स्थानावर आहे. तिघांपेक्षा जागा कमी असल्या तरी शिवसेनेला सोबत घेतल्याशिवाय कुणाचीच सत्ता जिल्हा परिषदेत येऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच मुंबई महापालिकेतील सत्तेचा तिढा सुटत नसल्याने कोल्हापूरला निर्णय लांबणीवर पडला आहे. उद्धव ठाकरे यांनीही गुरुवारी कोल्हापूरच्या पदाधिकाऱ्यांना तसे स्पष्टपणे सांगितले आहे. मात्र, एकूणच ठाकरे यांची देहबोली आणि जिल्ह्यातील राजकीय हालचाली पाहता ठाकरे यांच्याकडे दिलेल्या अहवालाचा सारांश भाजपविरोधीच असल्याचे मानले जाते. त्यामुळे कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेत शिवसेना भाजपला प्राधान्य देण्यापेक्षा अन्य पर्याय शोधण्याच्या तयारीत असल्याचे वातावरण आहे.शिरोळमधील दाखलाशिरोळमध्ये ज्या बहुजन विकास आघाडीमुळे शिवसेनेचे उल्हास पाटील हे आमदार बनले. किंबहुना याच आघाडीने पाटील यांना ‘स्वाभिमानी’तून बाहेर पडायला लावून आमदार केले हे वास्तव आहे. अशा परिस्थितीत महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ही सगळी आघाडीच भाजपमध्ये घेऊन शिरोळमध्ये ‘स्वाभिमानी’सोबतच शिवसेनेसमोरही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करून ठेवले आहे. याच पद्धतीने भाजप शिवसेनेला जाईल तेथे कोंडीत पकडणार असेल तर मग जिल्हा परिषदेत एकत्र यायचे तरी कशाला, अशी शिवसैनिकांची मानसिकता आहे.शिवसेना गावागावांतशिवसेना गेली अनेक वर्षे गावागावांत सक्रिय असताना, आंदोलने करत असताना दुसरीकडे भाजप मात्र आयात पुढाऱ्यांच्या जीवावर लढाया लढत आहे. ज्यांची संघटना गावापर्यंत नाही असा भाजप जर आम्हाला दामटण्याचे काम करत असेल तर ते का खपवून घ्यायचे, अशी विचारणा होत आहे.