शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

शिवसेनेत सुंदोपसुंदी संजय पवार : घरभेद्यांवर कारवाई करा

By admin | Updated: May 18, 2014 00:54 IST

कोल्हापूर : शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या निसटत्या पराभवानंतर शिवसेना नेत्यांत या पराभवास कारणीभूत कोण, यावरून सुंदोपसुंदी सुरू झाली आहे.

 कोल्हापूर : शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या निसटत्या पराभवानंतर शिवसेना नेत्यांत या पराभवास कारणीभूत कोण, यावरून सुंदोपसुंदी सुरू झाली आहे. जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी घरभेद्यांवर कारवाईची मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे निवेदनाद्वारे जाहीर केले आहे. या निवेदनात पवार म्हणतात, मंडलिक यांचा पराभव निष्ठावंत शिवसैनिकांच्या जिव्हारी लागला आहे. कोल्हापुरात शिवसेनेचा खासदार व्हावा, हे सेनाप्रमुखांचे स्वप्न होते. या निवडणुकीतही ते स्वप्न साकार होऊ शकले नाही, याची माझ्यासह अनेक शिवसैनिकांना खंत वाटते. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात गृहराज्यमंत्री सतेज पाटील व महाडिक गटांचे मनोमिलन झाले असतानाही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी चांगले काम केल्याने फक्त सात हजारांचेच मताधिक्य महाडिक यांना मिळू शकले. याउलट करवीर मतदारसंघात मात्र महाडिक यांना ३४ हजार मतांचे मताधिक्य मिळाले. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातही मंडलिक यांना फारसे मताधिक्य मिळाले नाही. या दोन मतदारसंघांत शिवसेनेचा उमेदवार पिछाडीवर का राहिला, याच्या कारणांचा शोध घ्यावा, अशी विनंती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संपर्कनेते दिवाकर रावते, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांना करणार आहे. शिवसेनेपेक्षा कुणी व्यक्तिकेंद्रित कामे केली व पक्षापेक्षा स्वत:चा स्वार्थ बघितला, अशा घरभेद्यांवर कारवाई करावी म्हणजे भविष्यात होणार्‍या विधानसभा निवडणुकीमध्ये अशा घरभेद्यांना नक्की चाप बसेल.