शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

जागेअभावी शिरोलीतील कचऱ्याचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: December 10, 2015 01:03 IST

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : दररोज पाच टन गोळा होणारा कचरा टाकायचा कुठे ?

शिरोली : शिरोली ग्रामपंचायतीकडे घनकचरा व्यवस्थापनासाठी जागा नसल्याने गावातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे; पण याकडे लोकप्रतिनिधींचे मात्र लक्ष नाही. शिरोली एमआयडीसीमुळे गावचा विस्तार वाढला आहे. गावभागाबरोबर माळवाडी, शिवाजीनगर, यादववाडी, सांगली फाटा जैन मंदिरापर्यंत गावाचा विस्तार झाला आहे. गावची लोकसंख्या सुमारे चाळीस हजारांवर पोहोचली आहे. एमआयडीसीमुळे गावची लोकसंख्या वाढली. गावातील व परिसरातील नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला. सोबत हॉटेल, ट्रान्सपोर्ट, विविध मार्केट, गोदामे आल्याने प्रदूषणही वाढू लागले. सध्या गावात घन कचऱ्याचा प्रश्न उद्भवू लागला असून, घनकचरा कुठेही पडू लागला आहे. तो कुजून दुर्गंधी पसरल्याने ग्रामपंचायतीने तीन वर्षांपूर्वी कचरा उठावासाठी तीन घंटागाडी खरेदी केल्या. त्याच्या मदतीने गावातील गोळा होणारा कचरा उचलून एमआयडीसीतील ओपन स्पेस असलेल्या खड्ड्यात टाकण्यास सुरू केले. पंचगंगा नदी शेजारी हा कचरा टाकण्यात येऊ लागला. गेली पाच वर्षे याठिकाणी कचरा टाकला जात आहे; पण एमआयडीसीने ही जागा महावितरण कंपनीला सबस्टेशन उभारण्यासाठी दिली आहे. महावितरण कंपनीने या जागेवर कचरा टाकू नये म्हणून फलक लावत रस्त्यावर चर मारली होती. त्यामुळे रविवारी कचरा उचलला गेला नाही; पण ग्रामपंचायतीने सोमवारी चर मुजवून पुन्हा कचरा टाकण्यास सुरुवात केली आहे. पण, भविष्याच्यादृष्टीने कचऱ्याचा प्रश्न उद्भवणार आहे. कारण दररोज पाच टन गोळा होणारा कचरा टाकायचा कुठे? हाही मोठा प्रश्न ग्रामपंचायतीसमोर आहे. (वार्ताहर)याबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी ही जागा एमआयडीसीची आहे आणि आमच्या जागेवर कचरा टाकू नये म्हणून ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेशी पत्र व्यवहार केला आहे.- औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारीशिरोली गावाने औद्योगिक वसाहत स्थापन्यासाठी जागा दिली; पण सध्या आमच्याकडे कचरा टाकण्यासाठीदेखील जागा नाही. आम्ही ओपन स्पेसवरती मोठ्या खड्ड्यात कचरा टाकतो. ही जागा आम्हाला द्यावी, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. - बिस्मिल्ला महात, सरपंचगेल्या पाच वर्षांपासून याठिकाणी कचरा टाकला जातो आहे, ही जागा आम्हाला कचरा टाकण्यासाठी मिळावी म्हणून औद्योगिक विकास महामंडळाला निवेदन दिले आहे. तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना भेटून ही जागा आम्हाला द्यावी, अशी मागणी करणार आहे. - सुरेश यादव, ग्रामपंचायत सदस्य