शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

शिरोलीला ग्रामविकास अधिकारी मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:27 IST

शिरोली : शिरोली ग्रामपंचायतीवर २०१७ मध्ये सत्तांतर झाल्यापासून ग्रामविकास अधिकारी पदाचा खेळखंडोबा सुरू असून, गेल्या दोन महिन्यांपासून तर ग्रामविकास ...

शिरोली : शिरोली ग्रामपंचायतीवर २०१७ मध्ये सत्तांतर झाल्यापासून ग्रामविकास अधिकारी पदाचा खेळखंडोबा सुरू असून, गेल्या दोन महिन्यांपासून तर ग्रामविकास अधिकारी नसल्यामुळे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या शिरोली ग्रामपंचायतीचा कारभार राम भरोसे सुरू आहे. यामुळे विकासकामांना खोळ बसलाच आहे आणि नागरिकांना विविध दाखल्यांसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत.

शिरोली ग्रामपंचायतीवर २०१७ मध्ये सत्तांतर झाल्यापासून ग्रामविकास अधिकारी पदाचा खेळखंडोबा सुरू आहे. अभ्यासू ग्रामविकास अधिकारी ए. एस. कठारे यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याने त्यांनाच मुदतवाढ मिळावी, म्हणून शाहू आघाडीने प्रयत्न केले; मात्र कठारे यांची नागावमध्ये बदली झाली. त्यानंतर एम. आर. पाटील यांनी पदभार स्वीकारला; मात्र त्यांच्या कार्यप्रणालीवर आघाडी नाराज होती आणि अशोक मुसळे यांनी काही दिवस पदभार स्वीकारला.

जिल्हा परिषदेत सत्तांतर होताच आघाडीने पुन्हा कठारे यांना आणले; कठारे यांनी पुन्हा पदभार स्वीकारला. मात्र एकाच अधिकाऱ्यांची पुन्हा त्याच ग्रामपंचायतीत नेमणूक करता येत नाही. ही चूक सुधारत कठारे यांची प्रशासनाने बदली केली. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात आर. सी. पाटील यांनी पदभार स्वीकारला. मात्र, त्यांनीही रजा टाकून बदलीसाठी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे. गेल्या तीन वर्षांत पाच ग्रामविकास अधिकारी आले आणि गेले; पण एकही थांबायला तयार नाही. ग्रामविकास अधिकाऱ्यांना ग्रामपंचायत रुचेना की ग्रामपंचायतीच्या कारभारी मंडळींना ग्रामविकास अधिकाऱ्यांचे कामकाज पसंत पडेना; पण यामुळे गावातील सुरू असलेल्या विकासकामांना खो बसला आहे. तसेच नागरिकांची गैरसोय होत आहे.

पाटोल यांच्या रजा कालवधीत हालोंडीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार देत असल्याचे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने कळवले; मात्र निवडणुकीचे कारण देत तेही फिरकले नाहीत. त्यानंतर चंदगड तालुक्‍यातून ग्रामविकास अधिकारी येणार असल्याचे सांगण्यात आले; परंतु ते अद्याप आलेले नाहीत.