शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळ तालुक्याच्या जि. प. आरक्षणाकडे नजरा

By admin | Updated: September 23, 2016 00:36 IST

अब्दुललाट, शिरोळ, उदगाव मतदारसंघांचे लक्ष : ‘एस.टी.’चे दाखले अडकले न्यायालयीन प्रक्रियेत

गणपती कोळी -- कुरूंदवाड --जिल्हा परिषद निवडणुकीची चाहूल राजकीय नेत्यांना लागली असून, इच्छुकांची तयारी चालू आहे. शिरोळ तालुक्यात अनुसूचित जमाती (एस. टी.) प्रवर्गासाठी एक जागा मिळाली आहे. मात्र, मतदारसंघनिहाय आरक्षण अद्याप जाहीर झाले नाही. तालुक्यात अब्दुललाट, शिरोळ व उदगाव या तीन जिल्हा परिषद मतदारसंघांत सर्वाधिक अनुसूचित जमाती प्रवर्गातील मतदार असून, यापैकी एका ठिकाणी आरक्षण पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रवर्गातील समाजाचे या आरक्षणाकडे लक्ष लागून राहिले आहे. जिल्हा परिषद निवडणूक फेब्रुवारीमध्ये होणार असल्याने इच्छुकांची संख्या वाढली असून, मतदारसंघनिहाय आरक्षणाकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. तालुक्यात अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी (एस. टी.) एक जागा आरक्षित करण्यात आली आहे. या प्रवर्गात आदिवासी कोळी समाजाचा समावेश असून, तालुक्यात २२ हजार मतदार आहेत. त्यामध्ये अब्दुललाट, उदगाव व शिरोळ या जिल्हा परिषद मतदारसंघांत सर्वाधिक मतदार आहेत. कोळी समाजाचे ‘एस.टी.’चे दाखले सध्या बंद झाल्याने या समाजाचा शासनाशी संघर्ष चालू असून, न्यायालयीन लढाईही चालू आहे. जातीनिहाय मतदार नोंदीनुसार ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी जागा आरक्षित केली जाते. काही ठिकाणी उमेदवाराअभावी पदेही रिक्त आहेत. तालुक्यात निर्णायक मतदार असूनही समाजाच्या एकसंधाअभावी हा समाज राजकीय बळी ठरत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत या तालुक्यातच अनुसूचित जमातीसाठी आरक्षण मिळाल्याने हा समाज पुन्हा जागृत होऊन निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. त्यामुळे कोणत्या मतदारसंघात आरक्षण पडते यासाठी सोडतीकडे लक्ष लागून राहिले आहे.लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षतालुक्यात निर्णायक मतदारांचा आदिवासी कोळी समाज असतानाही आमदार, खासदार सोयीस्कर या समाजाच्या हक्कांकडे दुर्लक्ष करीत आहेत. काही ठिकाणी या प्रवर्गातील निवडणुकीसाठी विदर्भातील नोकरीसाठी आलेल्या व्यक्तींना उमेदवारी देऊन राजकीय नेतेमंडळी राजकीय स्वार्थ साधत आहेत. त्यामुळे या समाजातून स्थायी भूमिका घेणाऱ्या राजकीय नेते, लोकप्रतिनिधींबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.मतदार संख्या अशीनिवडणूक आयोगाकडून मतदारसंघनिहाय आरक्षण सोडत काढताना त्या मतदारसंघातील आरक्षित समाजाची संख्या पाहिली जाते. त्यामुळे अंदाजे जिल्हा परिषद मतदारसंघात ‘एस.टी.’ मतदार पुढीलप्रमाणे - अब्दुललाट ४०००, शिरोळ ५०००, तर उदगांव ३००० पर्यंत अनुसूचित जमातीचे मतदार आहेत. त्यामुळे या तीन मतदारसंघांपैकी एका मतदारसंघात अनुसूचित जमातीसाठी आरक्षण पडण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोळी समाजावर काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारने अन्याय केला आहे. या समाजाला पुन्हा एस.टी.चे दाखले मिळवून देण्याचा भाजपच्या जाहीरनाम्यात आहे. मात्र, अद्याप याही सरकारने निर्णय घेतला नाही. या भागातील आमदार, खासदारांनीही समाजाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनदरबारी आपली ताकद पणाला लावावी. तालुक्यात कोणत्याही मतदारसंघात अनुसूचित जमातीचे आरक्षण पडल्यास या समाजाकडून निवडणूक लढविली जाईल.- विजय भोजे, जिल्हाध्यक्ष आदिवासी कोळी विकास मंडळ