शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याबाहेरही शिरोळचा आवाज!

By admin | Updated: May 29, 2017 00:41 IST

जिल्ह्याबाहेरही शिरोळचा आवाज!

गणपती कोळी । लोकमत न्यूज नेटवर्ककुरुंदवाड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुणे ते मुंबई आत्मक्लेश पदयात्रा सुरूकेली आहे. सुजलेले पाय, पायाला उठलेले फोड अन् ऐन संघर्षात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सोडलेली साथ अशा परिस्थितीतही नागरिकांतून शेट्टी यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्याबाहेर प्रथमच काढलेल्या या पदयात्रेतून शिरोळ तालुक्याचा आवाज घुमतो आहे.खासदार राजू शेट्टी यांनी शिरोळ तालुक्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटना स्थापन करून शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे लढणारा एकमेव शेतकरी नेता अशी त्यांनी स्वत:ची प्रतिमा निर्माण केली आहे. ऊस उत्पादकांमध्ये जागृती निर्माण करून साखर कारखानदार व प्रसंगी शासनाविरोधात एकजूट होत ताकद निर्माण केल्याने उसाला चांगला भाव मिळवून देण्यात शेट्टी यशस्वी झाले. चळवळीला राजकीय ताकदही तितकीच महत्त्वाची मानून २००४ साली शिरोळ विधानसभा केवळ शेतकऱ्यांच्या जिवावर लढविली. राजकीय शक्ती, धनाढ्य उमेदवार, प्रस्थापितांच्या विरोधातही केवळ शेतकरी, कष्टकरी मतदारांनी एक व्होट, एक नोटही देत मोठ्या मताधिक्याने त्यांना निवडून दिले. खासदार शेट्टी यांचा वारूरोखण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष, साखर कारखानदार यांनी जातीपासून ते पैशापर्यंत ताकद लावली. मात्र, शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र राहिल्याने खासदार शेट्टी यांना मागे वळून पाहावे लागले नाही. दुधाला दर मिळावा यासाठी दहा वर्षांपूर्वी खासदार शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातून अकरा दिवसांची आत्मक्लेश यात्रा काढली होती. जिल्ह्यातील व शेतकरी नेता म्हणून त्यांच्या पदयात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्यांनी ऊस, कापूस, तूरडाळी यासह शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी राज्यभर सभा गाजविल्या असल्या तरी स्वत:च्या कार्यक्षेत्रातील कोल्हापूर जिल्हा सोडून प्रथमच पुणे ते मुंबई पदयात्रा काढली आहे.शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा, उसाचा दुसरा हप्ता त्वरित द्या, मायक्रोफायनान्स कंपनीच्या जाचातून मुक्त करा, या प्रमुख मागण्यांसाठी पुणे ते राजभवन आत्मक्लेश पदयात्रा २२ मे पासून चालू केली आहे. ऐन संघर्षाच्या काळात संघटनेचा बुलंद आवाज म्हणून ओळखले जाणारे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी साथ सोडल्याने आंदोलनाच्या नेतृत्वाची जबाबदारी एकट्यावर पडली आहे. मात्र, त्यांच्या एकटेपणाची जाणीव होऊ नये, यासाठी या पदयात्रेत शिरोळ तालुक्यातील हजारो शेतकरी कार्यकर्ते खर्डा-भाकरी, लोणच्याचा ढिगारा घेऊन पदयात्रेतील लोकांच्या सेवेसाठी जात आहेत.आपल्या तालुक्यातील लोकांच्या पाठबळाने खासदार शेट्टी भारावून जात आहेत. त्यातच शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता न्याय मिळवून देण्यासाठी पायी जात असल्याने पुणे ते मुंबई मार्गावरील ग्रामस्थ खासदार शेट्टी यांचे स्वागत करून पदयात्रेत सहभागी होत असल्याने शेट्टी यांना सुजलेले पाय, पायाला उठलेले फोड याच्या वेदना लोकांच्या प्रेमात विरून जात आहेत. त्यामुळे खासदार शेट्टी यांच्या पदयात्रेने शिरोळ तालुक्याचा आवाज पुणे ते मुंबई मार्गावर घुमत आहे.