शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिवारं तयार ! शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे

By admin | Updated: June 1, 2016 00:54 IST

पेरण्या खोळंबल्या : मान्सूनचाही अंदाज येत नसल्याने बळिराजा चिंतेत; ५४८ हेक्टरवर भाताची धूळवाफ पेरणी

कोल्हापूर : यंदाच्या उन्हाळ्यात अपवाद वगळता एकही मोठा वळवाचा पाऊस झालेला नाही. आजही भाजून काढणारे ऊन आहे. पावसाची चाहूल लागली नसल्याने शेतकरी पेरणीसाठी थांबला आहे. पावसाचे वातावरण झाल्यावर पेरणीसाठी लगीनघाई सुरू होते; परंतु ते चित्र अजून पाहायला मिळत नाही. जिल्ह्यात आतापर्यंत ५४८ हेक्टर क्षेत्रात भाताची धूळवाफ पेरणी झाली आहे.यंदाच्या हंगामात पाऊसमान भरपूर असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. सोशल मीडियावरही त्याचेच चित्र रंगविले जात आहे; परंतु शेतकऱ्यांना त्याचे काही खरे वाटत नाही. जेव्हा हवामान खाते पाऊस जास्त आहे म्हणून सांगते तेव्हा त्याच्या उलटाच अनुभव येत असल्याचे त्यांचे म्हणणे असते. गेल्या वर्षीही पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे जमिनीची तहान भागली नाही. यंदाच्या उन्हाळ्यात प्रचंड उष्मा होता. त्यामुळे एक-दोन तर चांगले वळीव होतील, अशी अपेक्षा होती; परंतु काही तालुके वगळता असा पाऊस झालेला नाही. चांगले वळीव झाले की शेती मशागतीसाठी सहज तयार होते. नांगरटीनंतर निघणारी ढेकळे नुसत्या मशागतीने फुटत नाहीत. त्यासाठी पावसाची गरज असते. मातीलाही फूल येते. शेतकऱ्याचे कष्ट थोडे कमी होतात; परंतु यंदा त्यातले काहीच घडलेले नाही.बुधवारी मे संपून जून सुरू होत आहे. जून म्हटले की पावसाळा सुरू झाला असे म्हटले जाई; परंतु पावसाळा सोडाच, त्याची चाहूलही अद्याप लागलेली नाही. सायंकाळनंतर थोडे गार वारे सुटते; परंतु त्यालाही जोर नाही. यंदा ७ जूनला मृग नक्षत्र सुरू होते. त्याचे वाहन बेडूक आहे. पाऊस पडून गेल्यावर एकतर हवेतील उष्मा कमी होतो. लोकांनाही थोडे सुसह्य वाटते. पिण्याच्या पाण्याची काही प्रमाणात चिंता मिटते. जनावरांच्या पाण्याची सोय होते; परंतु यंदा यातले काहीच घडलेले नाही. त्यामुळे बहुतेक गावांतील माळामुरुडाची पिके वाळून गेली आहेत. जी नदी व विहिरीच्या पाण्यावर तगून आहेत, त्यांच्याही वाढीवर परिणाम झाला आहे. वळवाचा पत्ता नाही आणि मोसमी पावसाचेही ढग अजून जमा होईना झाले आहेत. आता कुठे अंदमानात पाऊस आल्याच्या बातम्या आहेत. केरळमध्ये १ जूनला पाऊस आल्यावर तो आपल्याकडे यायला आठवडा लागतो. त्यामुळे सध्याचे स्वच्छ वातावरण पाहून पाऊस यायला दहा जून उजाडेल की काय, अशी भीती शेतकऱ्याच्या मनात आहे. त्यामुळेच शेतजमीन तयार करून तो थांबला आहे. याचा परिणाम म्हणून अद्याप पेरणीला जोर लागलेला नाही.शेतकऱ्यांनी बी-बियाणे आणले आहे; परंतु पाऊस नसल्याने तो आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. पाऊस नाही. नदीत पाणी आहे; परंतु वीज नाही. त्यामुळे रोपलागणीसाठी तरवे टाकता आलेले नाहीत. शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. - विठ्ठल पाटील, शेतकरी, पाटपन्हाळा, ता. पन्हाळापावसाचा काहीच मागमूस नाही. त्यामुळे पेरणी करून धोका पत्करायला शेतकरी तयार नाहीत. साधारणत: मृग सुरू झाल्यानंतर त्याचा रागरंग पाहून पेरणीस गती येईल. - सुरेश मगदूम, कृषी उपसंचालक