शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

ती करते कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:34 IST

कोल्हापूर : ती बीएस्सीच्या पहिल्या वर्षात शिकते. कोरोनामुळे सध्या ऑनलाईन अध्यापन सुरू आहे. घरी बसून अभ्यास करीत असतानाच सामाजिक ...

कोल्हापूर : ती बीएस्सीच्या पहिल्या वर्षात शिकते. कोरोनामुळे सध्या ऑनलाईन अध्यापन सुरू आहे. घरी बसून अभ्यास करीत असतानाच सामाजिक आवड तिला स्वस्थ बसू देईना. यातूनच तिने थेट शववाहिकेचे स्टेअरिंग हातात घेतले. कोरोना बाधित मृतदेह उचलून सरण रचण्यापासून पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यापर्यंतची कामे ती मोठ्या धाडसाने करते. प्रिया प्रकाश पाटील असे त्या युवतीचे नाव आहे. कोरोना संसर्गजन्य आजार असल्याने रक्ताची नाती अंत्यसंस्कारापासून लांब राहत असली तरी प्रियासारखे सामाजिक कार्यकर्ते माणुसकीची नाती घट्ट करण्याचे काम करीत आहेत.

प्रिया येथील जाधववाडीची. ती विवेकानंद कॉलेजमध्ये बी.एस्सीच्या पहिल्या वर्गात शिकते. तिला सामाजिक कामाची आवड आहे. या आवडीतून ती कोरोना महामारीत गरजूंच्या मदतीला धावून जाण्याचा निर्धार केला.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गरजूंना मदतीसाठी ती सक्रिय झाली. भवानी फाउंडेशन आणि बालाजी कलेक्शनच्या प्रशांत पोफळे यांनी शिवसेनेचे कार्यकर्ते हर्षल सुर्वे, चैतन्य अष्टेकर, राकेश सावंत यांना दिलेल्या शववाहिकेवर ती कार्यरत आहे. सीपीआरसह शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये कोरोनाने मयत झालेले शव वाहिकेतून आणून पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी मदत करते. या कामात तिने झोकून दिले आहे. पुरुषांच्या बरोबरीने ती शववाहिकेवर चालक म्हणून कार्यरत असते. पीपीई किट परिधान करून कोरोनाबाधित शव उचलून वाहिकेत घेते. वाहिकेतून पंचगंगा स्मशानभूमीत घेऊन जात महापालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने अंत्यसंस्कार करते. अजूनही स्मशानभूमीत जात महिला, युवती अंत्यसंस्काराचे काम करण्याचे धाडस करीत नाहीत. पण प्रिया स्मशानभूमीत जात कोरोनाबाधीत शवावर अंत्यसंस्कार करते. तिच्या या धाडसाचे कौतुक होत आहे. आपल्याकडे अजूनही महिला स्मशानभूमीत जाण्यास घाबरत असताना ही तरुणी मात्र धाडसाने हे काम करत आहे.

कोट

कॉलेजचे शिक्षण घेत असतानाच सामाजिक कामाच्या आवडीतून कोरोनाबाधित शव वाहतूक करणाऱ्या वाहिकेवर काम करण्याचा निर्णय घेतला. चारचाकी वाहन चालवता येत असल्याने शववाहिकेवर चालक म्हणूनही काम करते. पंचगंगा स्मशानभूमीत आतापर्यंत ५० ते ५५ शवांवर अंत्यसंस्कार केले आहेत.

प्रिया पाटील, युवती

फोटो : १४०६२०२१- कोल- प्रिया पाटील

कोल्हापुरातील प्रिया पाटील ही युवती कोरोनाबाधित शव वाहिकेतून घेऊन जात पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास मदत करते.