शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवशीच तिला मृत्यूने कवटाळले !

By admin | Updated: May 3, 2014 17:02 IST

ती गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षाचा शेवटचा पेपर देऊन दुचाकीवरून मैत्रिणीसमवेत घरी निघाली होती आणि त्यात तिचा आज (शुक्रवार) वाढदिवस... तिच्या चेहर्‍यावर आनंद व हास्याचे फवारे होते... तिची दुचाकी गाडी शिवाजी विद्यापीठ रस्त्यावरून थेट टाकाळ्याकडे येत होती... कडक ऊन अन् वेळ दुपारी एक वाजण्याची... याच सुमारास अनुकामाणिका मंदिराजवळ पाठीमागून भरधाव येणार्‍या डंपरची तिच्या दुचाकीला जोराची धडक बसली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

कोल्हापूर : ती गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षाचा शेवटचा पेपर देऊन दुचाकीवरून मैत्रिणीसमवेत घरी निघाली होती आणि त्यात तिचा आज (शुक्रवार) वाढदिवस... तिच्या चेहर्‍यावर आनंद व हास्याचे फवारे होते... तिची दुचाकी गाडी शिवाजी विद्यापीठ रस्त्यावरून थेट टाकाळ्याकडे येत होती... कडक ऊन अन् वेळ दुपारी एक वाजण्याची... याच सुमारास अनुकामाणिका मंदिराजवळ पाठीमागून भरधाव येणार्‍या डंपरची तिच्या दुचाकीला जोराची धडक बसली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.काजल राजेंद्र पाटील (वय १८, रा. इंद्रप्रस्थ कॉलनी, सानेगुरुजी वसाहत) असे तिचे नाव. तिच्या मृत्यूची वार्ता कळताच सीपीआर रुग्णालयाच्या आवारात तिच्या आईवडिलांनी हंबरडा फोडला. दरम्यान, या अपघातप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी संशयित डंपरचालक बाहुबली जिन्नाप्पा शेट्याबोळ (३५, रा. मणेर मळा, गणेश कॉलनी, उचगाव, ता. करवीर) याला अटक केली. याबाबत पोलिसांनी सांगितले की, काजल पाटील व तिची मैत्रीण (नाव समजू शकले नाही) दुचाकीवरून शिवाजी विद्यापीठाकडून टाकाळ्याकडे येत होत्या. त्यावेळी पाठीमागून भरधाव येणार्‍या डंपरने काजलच्या गाडीला जोराची धडक दिली. यात ती रस्त्यावर पडून डंपरखाली सापडली. यात तिचा जागिच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपरचालक तेथून पसार झाला. हा अपघात समजताच संतप्त नागरिकांनी डंपरवर दगडफेक करून संताप व्यक्त केला. अपघाताची माहिती मिळताच राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी पंचनामा करून काजलची गाडी व डंपर पोलीस ठाण्यास आणला. यानंतर हा प्रकार तिच्या घरच्यांना कळविला. दुपारी तिची आई, वडील, विवाहित बहीण व सानेगुरुजी वसाहत परिसरातील नागरिक सीपीआर रुग्णालयात आले. त्या ठिकाणी तिच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला.

डंपरवर दगडफेक...घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. त्यामुळे संतप्त जमावाने अपघातानंतर डंपरवर जोरदार दगडफेक केली. यावेळी पोलीस येताच जमाव शांत झाला.वाढदिवसाचा बेत! मृत काजलचे वडील सत्यशोधक सहकारी बँकेत वसुली अधिकारी म्हणून काम करतात. ते मूळ नंदगाव (ता. करवीर) येथील आहेत. त्यांना पत्नी, दोन मुली आहेत. त्यांच्या पहिल्या मुलगीचा विवाह झाला आहे. त्यामुळे सानेगुरुजी वसाहत परिसरातील घरामध्ये तिघेजण राहात होते. आज (शुक्रवार) वाढदिवस अन् परीक्षेचा शेवटचा पेपर होता. तिचा सायंकाळी वाढदिवस करण्याचा बेत तिच्या कुटुंबीयांनी आखला होता. मात्र, वाढदिवस होण्याअगोदरच तिच्यावर काळाने झडप घातली.