शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
5
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
6
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
7
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
8
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
9
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
10
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
11
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
12
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
13
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
14
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
15
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
16
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
17
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
18
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
19
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
20
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी

शरद पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसू : आठवले

By admin | Updated: June 7, 2016 07:39 IST

केंद्रात मंत्रिपद हवे : मुंबई महापालिकेत आघाडीसाठी प्रयत्नशील

कोल्हापूर : केंद्रात एक मंत्रिपद व राज्यात विधान परिषदेच्या दोन जागा न मिळाल्यास पुढील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसू, असा गर्भित इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिला. ‘वैचारिक संवाद’ परिषदेसाठी ते येथे आले होते. मुंबई पालिकेत सेना, भाजपसह रिपब्लिकन पक्षाने आघाडी करून निवडणूक लढवावी, यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. आठवले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी रिपब्लिकन पक्षाला केंद्रात एक मंत्रिपद, दोन विधान परिषदेच्या जागा देण्याचे मान्य केले होते. परंतु, अद्यापही त्यांनी ही मागणी पूर्ण केलेली नाही. केंद सरकारने दलितांचे काही प्रश्न सोडविले. परंतु, विधान परिषदेच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला जागा मिळाली नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत हे काही दिवसांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून एका कार्यक्रमात बसले होते. त्याची दखल घेऊन भाजपने खोत यांना विधान परिषदेचे आमदार केले; पण रिपब्लिकन पक्षाला आमदारकी दिली नाही. खोत जर अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसणार असतील, तर माझी ताकद शरद पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची आहे. त्यामुळे भाजपने आमची दखल न घेतल्यास तो ही मार्ग आम्हाला खुला आहे, असे आठवले यांनी ठणकावून सांगितले. (प्रतिनिधी) अयोध्येतील राम मंदिरास विरोधअयोध्येत राम मंदिर बांधण्यास आपल्या पक्षाचा तीव्र विरोध असल्याचे सांगून आठवले म्हणाले, ‘मंदिर बांधणार असाल तर तिथे बुद्ध मंदिर व मशीदही बांधावी, असा आमचा आग्रह आहे. शालेय अभ्यासक्रमात भाजप सरकारकडून जे भगवेकरण सुरू आहे, त्यालाही आमचा विरोध आहे. कोल्हापुरात शाहू मिलच्या जागेवर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक व्हावे, यासाठी पाठपुरावा करणार आहे.’खडसे यांची पाठराखण...महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊ नये, असे माझे मत होते; पण त्यांनी नैतिकता स्वीकारून राजीनामा दिला. उलट, माहिती अधिकाराचा वापर करणारे कार्यकर्ते हेच भ्रष्टाचारी असतात, असे आठवले यांनी सांगितले. प्रभाग निश्चितीला विरोध...नगरपालिका, महापालिका निवडणुकीत चार प्रभागांचा मिळून एक प्रभाग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला आपला विरोध आहे. शिवसेना-भाजपची मतदारांची संख्या महानगरांत जास्त आहे. त्यामुळे त्यांनाच याचा फायदा होईल. छोट्या पक्षांना त्यांचा कोणता फायदा नसून, छोट्या पक्षांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही, असे आठवले म्हणाले.