शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

शरद पवार २७ पासून कोल्हापूर दौऱ्यावर; विविध कार्यक्रम

By admin | Updated: January 14, 2017 00:40 IST

कार्यकर्त्यांत उत्साह : जयसिंगराव पवार यांचा अमृतमहोत्सव

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार हे शुक्रवार, दि. २७ जानेवारीपासून दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या २८ ला होणाऱ्या अमृतमहोत्सव सोहळ्याच्या मुख्य समारंभासाठी ते येथे येत आहेत.डॉ. पवार यांचे अमृतमहोत्सवी वर्ष ३० डिसेंबरला सुरू झाले आहे; परंतु मुख्य सत्कार सोहळा २८ जानेवारीस केशवराव भोसले नाट्यगृहात सकाळी ११ वाजता होणार आहे. ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होत आहे. त्याची जोरदार तयारी सुरू असून, गौरवांकाचे कामही अंतिम टप्प्यात आहे.शरद पवार हे शुक्रवारी (दि. २७ ) सांगलीत येणार आहेत. तिथे दुपारी एका कार्यक्रमास उपस्थित राहून ते सायंकाळी कोल्हापुरात येणार आहेत. त्याच दिवशी महाराणा प्रताप चौकातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असलेल्या डॉ. शेळके यांच्या रुग्णालयाचे उद्घाटन, महापौर हसिना फरास यांचा सत्कार आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा मेळावा घ्यावा, असे नियोजन जिल्हा शाखेकडून सुरू आहे. ज्येष्ठ पत्रकार बाळ पोतदार यांनी लिहिलेल्या ‘गांधीजी होते म्हणून...’ या ग्रंथाचे प्रकाशनही पवार यांच्या हस्ते होणार आहे. दि. २७ ला सायंकाळी साडेपाच वाजता केशवराव भोसले नाट्यगृहात हा समारंभ होत आहे. आम्ही भारतीय लोक आंदोलन संस्थेच्यावतीने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली हा प्रकाशन समारंभ होईल.दरम्यान, दोन्ही काँग्रेसमध्ये राज्य स्तरावरच आघाडीच्या अद्याप फारशा हालचाली नाहीत. गेल्या निवडणुकीतही दोन्ही काँग्रेस जिल्हा परिषदेसाठी स्वबळावर लढल्या होत्या. आताही तशीच स्थिती आहे. जिल्हा परिषदेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया १ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. त्याआधीच हा दौरा होत असल्याने कार्यकर्त्यांनाही उत्साहित व्हायला मदत होऊ शकेल. (प्रतिनिधी)