शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

शाहू मार्केट टेंबलाईवाडीला जोडणार

By admin | Updated: January 19, 2016 00:36 IST

बाजार समिती : माजी संचालकांकडून लवकरात लवकर पैसे वसूल करा : चंद्रकांतदादा

कोल्हापूर : शाहू मार्केट यार्ड व टेंबलाईवाडी येथील नियोजित धान्य मार्केट जोडण्यासाठी रेल्वेरुळावर फाटक अथवा उड्डाणपूल करण्याबाबत रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही सहकार व पणनमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. पाटील यांनी रविवारी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत आढावा बैठक घेतली. माजी संचालकांवरील जबाबदारी निश्चितीचे काय झाले, असा सवाल करत लवकरात लवकर त्यांच्याकडून पैसे वसूल करा, असे आदेशही त्यांनी यावेळी दिले. टेंबलाईवाडी मार्केटमध्ये सुविधा नसल्याने धान्य व्यापारी लक्ष्मीपुरी सोडण्यास तयार नसल्याचे नंदकुमार वळंजू व सदानंद कोरगावकर यांनी निदर्शनास आणून दिले. शाहू मार्केटमधून टेंबलाईवाडी मार्केटमध्ये जाण्यासाठी सहा किलोमीटरचे अंतर पार करावे लागते. वाहतुकीचा खर्च अंगावर बसत असल्याने व्यापारीही तिथे जाण्यास नाखूश आहेत. यासाठी शाहू मार्केट ते टेंबलाईवाडी मार्केट जोडावे, अशी मागणी वळंजू व कोरगावकर यांनी केली. या दोन मार्केटमध्ये रेल्वे रूळ आहे, तेथून वाहतूक करण्यासाठी एक तर रेल्वे फाटक करायला हवे अन्यथा उड्डाणपूल उभारावे लागेल. उड्डाणपुलाबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलू, पण त्या ऐवजी रेल्वे फाटक केले तर ते अधिक सोयीचे होईल, असे मंत्री पाटील यांनी सांगितले. याबाबत रेल्वेमंत्र्यांशी बोलून मार्ग काढू, असे आश्वासन त्यांनी दिले. २२ माजी संचालकांवर जबाबदारी नोटिसा लागू केल्या असून जानेवारीअखेर पैसे भरण्याचे आदेश दिल्याचे जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी सांगितले. वेळेत पैसे भरले नाही, तर पुढील कारवाई काय करणार, अशी विचारणा मंत्री पाटील यांनी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी महसुली कारवाई करणार असल्याचे काकडे यांनी सांगितले. अस्थापनावर ४५ टक्केपेक्षा जास्त खर्च होत असल्याचे निदर्शनास आणून देत सुरक्षारक्षक समितीचे आहेत की खासगी कंपनीचे अशी विचारणा मंत्री पाटील यांनी केली. इतर समित्यांमध्ये खासगी सुरक्षारक्षक नेमले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. गूळ क्लस्टरसाठी शासन पातळीवर प्रयत्न करणार असून, शेतकऱ्यांच्या हिताचे प्रस्ताव पाठवा, निधी कमी पडू देणार नाही, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्णातील उर्वरित बाजार समित्यांसह सांगली व सातारा जिल्ह्यांतील समित्यांचा आढावा घेतला. बैठकीला विभागीय सहनिबंधक राजेंद्र दराडे, समितीचे सभापती परशराम खुडे, विलास साठे, विजय नायकल, पणन मंडळाचे अधिकारी, समितीचे संचालक उपस्थित होते.