शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

शहरभान-०५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:25 IST

कोल्हापूर महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. निवडणूक आघाड्यांवर मोर्चेबांधणी, सत्ता समीकरणे, अमक्याची ताकद, तमक्याची ताकद यांची नेहमीचीच साचेबद्ध ...

कोल्हापूर महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. निवडणूक आघाड्यांवर मोर्चेबांधणी, सत्ता समीकरणे, अमक्याची ताकद, तमक्याची ताकद यांची नेहमीचीच साचेबद्ध मांडणी सुरु झाली आहे. ही निवडणूक, त्याच त्या साचेबध्द राजकारणातून बाहेर पडून शहराला नवा विचार, नवी दिशा देणारी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्या अनुषंगाने कोल्हापुरात शहरभान ही नवी चळवळ रुजू होऊ पाहात आहे. त्यामागील भूमिका मांडण्याचा प्रयत्न...

शहरे ही नागरिकांची, नागरी नेतृत्वाची कल्पकता आणि बुद्धिमत्ता यांची निदर्शक असतात. ‘शहर’ हे मानवाने निर्माण केलेले विश्व आहे. जगातील कित्येक शहरे आकर्षक आहेत तर कित्येक ओंगळवाणी आहेत. अत्यंत गुंतागुंतीची आणि वैविध्यपूर्ण रचना कोणती असेल तर ती आहे शहरांची. शहर नियोजन आणि शहर विकास ही सतत घडणारी गुंतागुंतीची प्रक्रिया असते. यासाठी सजग, कल्पक नागरी नेतृत्वाची शहरांना गरज आहे. जगात जी काही संपन्न आणि आकर्षक शहरे आहेत, ती स्थानिक नेतृत्वानेच आपल्या कल्पकतेच्या आणि बुद्धीच्या ताकदीने साकारली आहेत. नागरी नेतृत्वाची कल्पकता आणि बुद्धिमत्ता यांची ‘शहरे’ ही निदर्शक असतात. भारत अजूनही यापासून कोसो दूर आहे.

हे शहर माझं आहे. माझं शहर मला सांभाळायचे आहे. माझं शहर सोयीस्कर, आरोग्यसंपन्न, सौंदर्यपूर्ण झालं पाहिजे. माझ्या विधायक सहभागाची माझ्या शहराला अत्यंत गरज आहे. माझ्या शहरासाठी मला शक्य आहे ते योगदान देणं हे माझे कर्तव्य आहे! असं प्रत्येक नागरिकाला (आमदार, खासदारांसहित) ज्यावेळी वाटेल, त्यावेळी ते आपल्या शहराबाबत सारासार विचार करू लागतील. शहर नियोजन, शहर नियोजनाची आव्हाने, गुंतागुंत समजून घेतील. सक्षम प्रतिनिधीबाबत अट्टाहास करतील. महापौर-महापौर या वायफळ खेळात मौल्यवान वेळ वाया घालवणार नाहीत. राजकीय, शासकीय व्यवस्थेत त्याचबरोबर कायद्यात आवश्यक ते बदल करण्यासाठी प्रयत्न करतील.

‘होम सिटी’ ही एक छान संकल्पना आहे. माझं, आपलं मूळ गावं, आपल्या सगळ्यांचं एक व्यापक ‘घर’ या अर्थाने ही एक खूप छान संवेदनशील संकल्पना आहे. प्रत्येक नागरिक हा ‘शहर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यापक कुटुंबाचा सदस्य असतो. प्रत्येक नागरिकाला आपल्या शहराप्रति आपुलकी असते, जिव्हाळा असतो. प्रत्येक शहराला स्वतःची संस्कृती असते, ओळख असते. त्याला आपल्या शहराची ओळख, संस्कृती जपली जावी, असे अंतस्थ वाटत असते. शहराच्या धोरणकर्त्यांनी, शहराप्रति असलेली नागरिकांची आपुलकी-जिव्हाळा, शहराची संस्कृती, ओळख, निष्ठा सांभाळायची असते, वृद्धिंगत करायची असते. खरंतर ही जबाबदारी कुटुंब प्रमुख या नात्याने ‘महापौरांची’ असते. महापौर तेवढे संवेदनशील आणि दर्जेदार असायला हवेत. कोल्हापुरात याची कायमच वानवा आहे.

आपल्याकडे महापौर नागरिकांच्या इच्छेचा नसतो. आमदारांच्या राजकीय सोयीचा असतो. कुटुंब प्रमुख या नात्याने जबाबदारीची जाणीव, क्षमता आणि शहरभान असलेले ‘महापौर’ सध्यातरी शहरांसाठी ‘दिवास्वप्न’ आहे. सध्या महापौर पद हे शहरात राजकीय इर्षा, तेढ, बडेजाव यात भर घालणारे आहे. शहरातील वातावरण बिघडवणारे आहे. दर अडीच-तीन महिन्यांनी निघणाऱ्या उन्मादी मिरवणुकांची सर्वसामान्य नागरिकांना उबग आहे. लोकांना खरोखर ज्यावेळी ‘शहरभान’ येईल, त्यावेळी या अनिष्ट प्रथा बंद होतील.

शहर सांभाळणे, शहरांच्या वाढीचं नियोजन करणे, विकासाची धोरणे ठरवणे ही खूप गुंतागुंतीची संवेदनशील प्रक्रिया आहे. युरोप, अमेरिकेत व्यापक घर सांभाळणारी प्रशासकीय आणि राजकीय व्यवस्था विकसित झाली आहे. ‘शहरभान’ असलेला नागरी समाज, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय आणि योग्य ताळमेळ आहे. यांच्या समन्वयातूनच युरोपिय शहरे आकर्षक बनली आहेत. समन्वयातूनच तेथे उच्च गुणवत्तेचे नागरी जीवन साकारले आहे. शहर नियोजन, शहर विकास याबाबत शिक्षण आणि संशोधनात युरोप आघाडीवर आहे. तिथे शालेय शिक्षणातच नागरी संस्कारांचे बाळकडू विद्यार्थ्यांना दिले जाते.

आपले नगसेवक किमान अधिकाऱ्यांशी सभ्यतेच्या भाषेत विचारांची, संकल्पनांची देवाणघेवाण करू शकले, असभ्य शिवराळ भाषा टाळू शकले, अरेरावी टाळू शकले, तरी शहरस्वास्थ्यात खूप फरक पडेल. पालिकेची कार्यसंस्कृती सुधारेल. उन्नतीच्या दिशेने वाटचाल सुरु होईल. निवडणुका सत्ताधीश, सम्राट अथवा कमिशन एजंट निवडण्यासाठी नसतात. त्या प्रतिनिधी निवडण्यासाठी असतात. तर मग एवढा भरमसाठ खर्च हे लोक का करतात...? थोडातरी विचार मतदारांनी करावा. ‘लोकमत’नेही नगरसेवकांना तुम्ही सत्ताधीश नाही, प्रतिनिधी आहात...! याचे सतत ‘भान’ द्यावे . ‘शहरभान’ जपावे.

आर्कि. जीवन बोडके.