शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

शविआचा फुसका ‘बार’

By admin | Updated: July 16, 2014 00:58 IST

इचलकरंजी नगरपालिका : नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतून घ्यावी लागली माघार

राजाराम पाटील -इचलकरंजीयेथील नगराध्यक्षपदासाठी असलेले सर्वसाधारण महिला आरक्षण आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिकेमध्ये विरोधी असलेल्या शहर विकास आघाडीने सत्तारूढ कॉँग्रेस आघाडीमध्ये फूट पाडण्यासाठी भरलेला ‘बार’ फुसका ठरला. राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील एक गट हाताशी लागत नसल्याने बेरजेच्या राजकारणासाठी टाकलेले फासे उलटले आणि नगराध्यक्षपदाच्या स्पर्धेतूनच माघार घेण्याची नामुष्की ‘शविआ’वर आली.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार राजू शेट्टी यांच्याकडून कॉँग्रेसचे कल्लाप्पाण्णा आवाडे यांना हार पत्करावी लागली. त्यामुळे पालिकेत कॉँग्रेस आघाडीच्या विरोधात असलेल्या शहर विकास आघाडीमध्ये उत्साह निर्माण झाला. अशा पार्श्वभूमीवर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम लागल्यामुळे ‘शविआ’ने सत्तारूढ कॉँग्रेस आघाडीमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न जोरदारपणे सुरू केले.इकडे शहरातील आमराईमध्ये असलेल्या एका फार्महाऊसवर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीमध्ये नगरपालिकेमधील सध्या सुरू असलेले राजकारण, आगामी विधानसभा निवडणुका आणि त्यानंतर कराव्या लागणाऱ्या राजकीय हालचालींचा अंदाज घेण्यात आला. सध्या कॉँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी प्रत्येकी पाच महिन्यांच्या कालावधीने पाच नगरसेविकांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातीलच एक कालावधी राष्ट्रवादी कॉँग्रेसला देण्यात यावा; अन्यथा उपनगराध्यक्षपदासाठी पुढील दहा महिन्यांचा कालावधी मिळावा, अशी मागणी राष्ट्रीय कॉँग्रेसकडे करण्याचा निर्णय या बैठकीत घेतला गेला.