शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

सात महिन्यांपूर्वी गीतांजली...आता पल्लवी!

By admin | Updated: June 22, 2016 01:30 IST

दुसरा बळी : छेडछाडीने धगधगतोय धनगरवाडा; गुंडांचा कायमचा बंदोबस्त गरजेचा

तानाजी पोवार --कोल्हापूर --दारात सुया टोचलेले लिंबू टाकणे, देव घालणे, कौल लावणे अशा अंधश्रद्धेच्या फेऱ्यात आज बोंदे्रनगरातील धनगरवाड्यातील लोकांचा प्रवास सुरू आहे. मोलमजुरीसाठी त्यांचे हात नेहमीच कामात लागले, शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले अन् अशिक्षितपणाची झूल पांघरून हा धनगरवाडा अंधश्रद्धेकडे आपोआप झुकला. गेल्या काही वर्षांत पहाटे, सकाळी काम करून दिवसभर वसाहतीत टिंगल-टवाळी करणाऱ्या युवकांच्या टोळक्याने येथील युवती, महिलांना लक्ष्य करून आपले गुंडगिरीचे बस्तान बसविले. गेल्या सात महिन्यांत गीतांजलीपाठोपाठ पल्लवीचाही या टोळक्याने बळी घेतला.राधानगरी, गगनबावडा, भुदरगड या तालुक्यांतील दुर्गम भागातील हा धनगर समाज गेल्या पंचवीस वर्षांत हातांना काम मिळविण्यासाठी हळूहळू कोल्हापूरकडे आला, बोंद्रेनगरानजीक त्यांचा ठिय्या पडला. तीच बनली धनगर वसाहत. फुलेवाडी रिंग रोडवर बोंद्रेनगरनजीक हा सुमारे हजार-बाराशे लोकवस्तीचा धनगरवाडा. सोयी-सुविधांच्या गर्तेत अडकलेला हा परिसर आजही पल्लवीच्या मृत्यूने धगधगत आहे. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत हा धनगरवाडा नेहमीच वादावादीच्या निमित्ताने जागाच असतो. गुंडगिरीच्या दहशतीमुळे सात महिन्यांपूर्वी याच परिसरातील गीतांजली पंडित बोडके या महाविद्यालयीन युवतीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली होती. त्यानंतर आता पल्लवी बोडकेचा बळी गेला. दोन्हीही घटना परिसरातील गुंडगिरीच्या टोळक्याच्या छेडछाडीला कंटाळून घडल्या आहेत. गुंड टोळक्यांकडून रोजच येथे नवनवे प्रकार घडतात. या गुंडांच्या आज पोलिसांनी मुसक्या आवळल्या असल्या तरीही त्यांच्या दहशतीखाली महिला, युवा पिढी, वयोवृद्ध आहेत.दुर्गम भागातील काही मोजकीच सात-आठ कुटुंबे गेल्या २५ ते ३० वर्षांपूर्वी रोजगार व कामाच्या शोधासाठी बोंद्रेनगर येथे आली. कामे मिळाल्याने त्यांनी येथेच ठिय्या मारला. हळूहळू वस्ती वाढत आज सुमारे हजार-बाराशेंची वसाहत झाली. पुरुष मंडळी फिरून झाडे तोडणे, हमाली करणे, मार्केट यार्डमधून कांदा-लसूण आणून दारोदारी विक्रीची कामे करतात; तर महिला धुणे-भांड्याची घरकामे करून कुटुंबाचा गाडा चालवितात. बहुतांश युवक हे सकाळी फिरून चारचाकी वाहने धुण्याची कामे करतात. त्यामुळे हे गुंड दिवसभर रिकामटेकडे राहून वसाहतीत कारनामे घडवीत असतात.मोलमजुरीच्या मागे लागत अशिक्षित राहिलेला हा समाज अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहे. देवाच्या करणीसाठी श्रेष्ठ मानणाऱ्या विठ्ठलाई देवीचा पगडा या वसाहतीवर जाणवतो; त्यामुळे येथे नेहमीच चौकाचौकांत सुया खोवलेल्या लिंबंूचे दर्शन होते. या अशिक्षित, अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्यांचा गैरफायदा घेत येथे गुंडगिरी फोफावत आहे. (पूर्वार्ध)गुंडांचा पोलिसांसमोरही मुजोरपणापल्लवीचा बळी गेल्यानंतर अटकेसाठी ताब्यात घेतलेल्या संशयितांनी पोलिसांसमोरच आपला मुजोरपण दाखवून दिला. हातांत बेड्या घातलेल्या असतानाही या गुंडांनी परिसरातील युवकांनाही ‘आल्यावर बघून घेतो’ अशा उघड-उघड धमक्या दिल्या.त्यांना पोलिसही काही करू शकले नाहीत. त्यामुळे या गुंडांची परिसरात प्रचंड दहशत असल्याचे दिसून येते.‘निकिता’च्या आधारासाठी वाघमोडे यांचा हातकोल्हापूर : धनगर समाज क्रांतिकारी संघाचे संस्थापक विलासराव वाघमोडे (बापू) यांनी निकिताच्या घरातील रेशन, शिक्षणाच्या खर्चासह तिच्या आजीच्या औषधाचा खर्च उचलण्याची तयारी दाखविली आहे. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपल्याने बोडेकर कुटुंब अक्षरश: वाऱ्यावर पडले होते. घरात आजी; पण तीही आजारी असल्याने उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला होता. अशावेळी वाघमोडे यांनी बोडेकर कुटुंबीयांना दरमहा ७०० रुपये मदत देण्यास सुरुवात केली. गेली नऊ वर्षे वाघमोडे ही मदत न चुकता देत आहेत. दर महिन्याला निकिताचे चुलते वाघमोडे यांच्या लक्ष्मीपुरी येथील कार्यालयातून ही रक्कम घेऊन जात असल्याने बोडेकर कुटुंबीयांना मोठा आधार मिळाला होता.बोंद्रेनगर धनगर वसाहतीत पल्लवीच्या बळीनंतरही गुंडांची दहशत कायम असल्याने काही वयोवृद्धच घराच्या दारात बसून घडल्या प्रकाराची छुप्या आवाजात चर्चा करीत आहेत.