शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्गातील सात वनक्षेत्रे आता संवर्धन राखीव वनक्षेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:01 IST

संदीप आडनाईक/लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई/कोल्हापूर - कोल्हापूर वन विभागाच्या कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्गातील सात वनक्षेत्रांना राज्य सरकारने आता ‘संवर्धन राखीव ...

संदीप आडनाईक/लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई/कोल्हापूर - कोल्हापूर वन विभागाच्या कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्गातील सात वनक्षेत्रांना राज्य सरकारने आता ‘संवर्धन राखीव वनक्षेत्रा’चा (कॉन्झर्वेशन रिझर्व्ह) दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत वन्यजिवांचा, प्रामुख्याने वाघांचा कॉरिडॉर कोयना, चांदोली, राधानगरी, तिलारी ते आंबोलीपर्यंतचा सलग एकूण ८६ हजार ५५४ हेक्टरच्या वनक्षेत्राला वन्यजीव कायद्यानुसार संरक्षण मिळणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पार पडलेल्या ‘राज्य वन्यजीव मंडळा’च्या बैठकीत या प्रस्तावाला ही मंजुरी मिळाली आहे. यामध्ये कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासह तिलारी संवर्धन राखीव वनक्षेत्रांसह सात वनक्षेत्रांचा समावेश आहे. ही माहिती कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. क्लेमेंट बेन यांनी शुक्रवारी दिली.

सह्याद्रीमधील एकूण ८६ हजार ५५४ हेक्टर वनक्षेत्राला संरक्षण

९,३२४ हेक्टरमधील विशाळगड, ७,२९१ हेक्टरमधील पन्हाळा, १०,५४८ हेक्टरमधील गगनबावडा, २४,६६३ हेक्टरमधील आजरा-भुदरगड, २२,५२३ हेक्टरमधील चंदगड, सातारा जिल्ह्यांतील ६,५११ हेक्टरमधील जोर-जांभळी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ५६९२ हेक्टरमधील आंबोली-दोडामार्ग येथील वनक्षेत्रांना ‘कॉन्झर्व्हेशन रिझर्व्ह’चा दर्जा देण्याचा प्रस्ताव कोल्हापूर वन विभागाने राज्य सरकारला पाठवला होता. आज झालेल्या ‘राज्य वन्यजीव मंडळा’च्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता मिळाली. यामुळे सह्याद्रीच्या वनक्षेत्रामधील एकूण ८६ हजार ५५४ हेक्टर वनक्षेत्राला संरक्षण मिळाले आहे. याशिवाय साताऱ्याजवळील ८६६ हेक्टरमधील मायणी पक्षी अभयारण्यालाही या ‘कॉन्झर्व्हेशन रिझर्व्ह’चा दर्जा देण्यात आले आहे.

कोट

राखीव वनक्षेत्रांमधील जागा या वन कायद्याअंतर्गत संरक्षित होतात; तर ‘कॉन्झर्व्हेशन रिझर्व्ह’मध्ये आरक्षित केलेल्या जागा या ‘वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२’अंतर्गत संरक्षित होतात. त्यामुळे अशा जागांना राखीव वनक्षेत्राच्या संरक्षणापेक्षा उच्च दर्जाचे संरक्षण मिळाले आहे.

- सुहास वायंगणकर,

सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ

(संग्रहित छायाचित्र :०४१२२०२०-कोल-तिलारी फॉरेस्ट)