शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्तात्रय शिंदे यांचे निधन

By admin | Updated: September 12, 2015 00:50 IST

स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधीजी यांच्याबरोबर दत्तात्रय शिंदे यांचा लढ्यात सहभाग

कोल्हापूर : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी कार्यकर्ते दत्तात्रय ऊर्फ दत्ता अनंत शिंदे (वय ९६) यांचे शुक्रवारी सकाळी गोवा येथे वृद्धापकाळाने निधन झाले. सायंकाळी त्यांच्यावर पंचगंगा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी माणिक, मुलगे प्रकाश, किरण, मुलगी सरिता चव्हाण व सुना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे.ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक शिंदे हे गेल्या महिन्याभरापासून मुलगी सरिता अजित चव्हाण यांच्याकडे गोवा येथे राहत होते. तेथेच शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास त्यांचे वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव सायंकाळी येथील टाकाळ्यातील ताराराणी विद्यापीठाशेजारील निवासस्थानी आणण्यात आले. या ठिकाणी त्यांच्या कुटुंबीयांसह मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने नायब तहसीलदार अनंत गुरव यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. यावेळी स्वातंत्र्यसैनिक, विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.शिंदे यांचा जन्म रविवार पेठेत झाला. त्यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले. त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधीजींच्या बरोबर लढ्यात सहभाग घेतला. स्वातंत्र्याच्या विविध आंदोलनांत सहभाग घेऊन ब्रिटिशांविरोधात रान उठविले. त्यांना १९४३ ते १९४६ या कालावधीत ३ वर्षे ६ महिने तुुरुंगवास भोगावा लागला. त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्र सत्याग्रहाच्या पहिल्या तुकडीचे त्यांनी नेतृत्व केले. स्वातंत्र्यानंतर त्यांनी शिक्षणशास्त्र अभ्यासक्रम पूर्ण करून विक्रम हायस्कूल येथे शिक्षक म्हणून नोकरी स्वीकारली. या ठिकाणी ते मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. ते कोल्हापूर जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा शासनासह विविध संस्था व संघटनांकडून अनेक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. त्यांनी सामाजिक, राजकीय, कामगार क्षेत्रात भरीव काम केले आहे. कुष्ठरोग निवारण, रॉकेलवाल्यांसाठी संघ स्थापन, महापालिका कामगारांची संघटना अशा ठळक बाबींचा यामध्ये समावेश आहे. शिवाजी विद्यापीठाने त्यांना विशेष पेन्शन सुरू केली होती; परंतु ती नाकारून त्यांनी त्याबदल्यात गांधी अध्यासन सुरू करण्याची विनंती केली. त्यांच्यामुळे आताचे अध्यासन सुरू झाले. या माध्यमातून त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत गांधी विचारांच्या प्रसाराचे कार्य केले. महात्मा गांधी, विनोबा भावे, हरिभाऊ लिमये, जयप्रकाश नारायण, नानासाहेब गोरे, एस. एम. जोशी, निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, चंद्रकांत पाटगांवकर, जयवंत मटकर, आदी थोर व्यक्तींचा त्यांना सहवास लाभला. (प्रतिनिधी)स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधीजी यांच्याबरोबर दत्तात्रय शिंदे यांचा लढ्यात सहभागशिंदे यांना १९४३ ते १९४६ दरम्यान ३ वर्षे ६ महिने तुरुंगवास भोगावा लागला.संयुक्त महाराष्ट्र सत्याग्रहाच्या पहिल्या तुकडीचे त्यांनी नेतृत्व केले