इचलकरंजी : येथील डीकेटीईच्या टेक्स्टाइल डिप्लोमामध्ये शिक्षण घेणाऱ्या सहा विद्यार्थ्यांची वेलस्पन कंपनीमध्ये पॅकेजसहित निवड झाली. त्यामध्ये दिशा टंगसाळे, पूर्वा जिजुगे, नम्रता प्रभू, ज्ञानेश्वरी कुंभार, नवनाथ चौगुले, श्रावणी चिमटे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
वेलस्पन ही कंपनी टेरीटॉवेल उत्पादनात देशभरात अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते. आशियातील टेरीटॉवेलचे उत्पादन घेणारी ही दुसऱ्या क्रमांकावरील मोठी कंपनी आहे. जगभरातील ५० देशांमध्ये या कंपनीच्या टेरीटॉवेल उत्पादनाचे निर्यात होते. दरवर्षी ही कंपनी डीकेटीईतील विद्यार्थ्यांच्या कॅम्पस निवडीसाठी भेट देत असते. याही वर्षी कंपनीमार्फत आयोजित रिटन टेस्ट, पर्सनल इंटरव्ह्यू अशा फेऱ्यांमधून विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमतांची चाचणी घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या एकूणच शैक्षणिक गुणवत्तेवरून त्यांची उत्तम पॅकेजसह निवड झाली.
काळाची गरज ओळखून लॉकडाऊन काळातदेखील विद्यार्थ्यांचे १०० टक्के क्वॉलिटी प्लेसमेंट व्हावे, यासाठी डीकेटीईमार्फत ऑनलाईन कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन केले जाते. डीकेटीईचे ऑनलाईन प्रणालीद्वारे प्राध्यापक व विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण प्रणालीचा वापर करून सर्व शैक्षणिक ज्ञान घरात बसून घेत आहेत.
डीकेटीईमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी राबविण्यात येणारे सॉफ्ट स्कील प्रोग्रॅमस, इंडस्ट्रियल प्रशिक्षण, इंडस्ट्री व्हिजिट, गेस्ट लेक्चर्स या सर्वांचा फायदा विद्यार्थ्यांना होत असतो. विद्यार्थ्यांचे प्रा.डॉ.पी.व्ही.कडोले, प्रा.डॉ.यू.जे.पाटील, प्रा.एस.ए.शेट्टी यांनी अभिनंदन केले.
फोटो ओळी
११०५२०२१-आयसीएच-०२-दिशा टंगसाळे
११०५२०२१-आयसीएच-०३ - पूर्वा जिजूगे
११०५२०२१-आयसीएच-०४ - नम्रता प्रभू
११०५२०२१-आयसीएच-०५- ज्ञानेश्वरी कुंभार
११०५२०२१-आयसीएच-०६- नवनाथ चौगुले
११०५२०२१-आयसीएच-०७-श्रावणी चिमटे