शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

सचिव शासनाच्या दारात, तर शेतकरी वाऱ्यावर

By admin | Updated: July 16, 2014 23:45 IST

गेले ४१ दिवस गटसचिवांचे कामबंद आंदोलन : ५०० कोटींचे आर्थिक व्यवहार ठप्प

प्रकाश पाटील- कोपार्डे‘समान काम समान दाम’ या मागणीबरोबर संस्थांच्या व्यवस्थापन खर्चासाठी तीन टक्के सानुग्रह अनुदान शासनाने द्यावे, या दोन प्रमुख मागण्यांसाठी जिल्ह्यातील गटसचिवांनी लेखणीबंद आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने सेवा संस्थाद्वारे कृषी कर्जवाटपाचे होणारे ५०० कोटींचे व्यवहार ठप्प झाले आहेत. गेले ४१ दिवस मागण्यांसाठी गटसचिव शासनाच्या दारात डोळे लावून आहेत. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पैशांची उपलब्धता होत नसल्याने शेतकरी मात्र वाऱ्यावर सोडला गेला आहे.कृषी कर्जवाटपाची पद्धत त्रिस्तरीय आहे. प्रथम जिल्हा बँक त्यानंतर सेवा संस्था व त्यानंतर शेतकरी असे कृषी कर्जाच्या वाटपाची पद्धत आहे. सध्या एकरी ३४ हजार कृषी कर्ज मर्यादा आहे. शासनाने शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतचे कर्ज व्याजमुक्त, तर तीन लाखांवर दोन टक्के व्याज शेतकऱ्याने मुदतीत कर्ज फेडल्यास आकारले जाते. बहुतांश शेतकरी हे अल्पभूधारक असल्याने त्यांना तीन लाखांच्या आतच रक्कम मिळत असून, ती बिनव्याजी असल्याने सेवा संस्था अडचणीत आल्या आहेत. तीन लाखांवरील कर्जाला दोन टक्के व्याज आकारले जाते. यातून सेवा संस्थांना कोणतीच मिळकत नाही.पूर्वी जिल्हा बँका संस्थांना १२ टक्के व्याज दराने पैसे देत होती. त्यातील तीन टक्के सेवा संस्थांना मार्जिन म्हणून व्याज परतावा करत होती. वैद्यनाथन समितीने ही पद्धतच बंद करून ज्या त्या संस्थेने आपला व्यवस्थापन खर्च उभारावा अशी शिफारस केल्याने संस्था गोत्यात आल्या आहेत. गटसचिवांची लेखणी बंद जिल्ह्यात १७२० सेवा संस्था कार्यरत असून, १३०० गटसचिवांनी आंदोलनात भाग घेतला असून, सेवा संस्थांचे काम ठप्प झाले आहे. खरिपासाठी बी-बियाणे, खते खरेदी व इतर आर्थिक व्यवहार होत नाहीत. तसेच शासनाच्या पीक कर्जाच्या वसुलीची मुदत ३० जूनपर्यंत होती. याला मुदतवाढ न दिल्यास मुदतीत कर्ज न फेडल्याने ६ टक्के व्याज परताव्याला शेतकरी मुकणार आहे.