शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

बदनामीच्या खुलाशास तीन महिन्यांनी सवड

By admin | Updated: November 26, 2014 00:23 IST

शिवाजी विद्यापीठाचा कारभार : विषय शाहू व्याख्यानाचा

कोल्हापूर : एखाद्या संस्थेच्या प्रतिमेस तडा जाईल, अशी बातमी वृत्तपत्रांत आल्यावर संबंधित संस्था तातडीने त्यासंबंधीचे म्हणणे स्वत:हून देते. शिवाजी विद्यापीठाबाबतीत अशाच स्वरूपाची माहिती ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यावर त्याचे स्पष्टीकरण करण्यासाठी मात्र विद्यापीठाला तब्बल तीन महिन्यांनी सवड मिळाली. त्यावरून विद्यापीठाच्या कामाची गती स्पष्ट होत असल्याचे दिसत आहे. विद्यापीठ प्रतिवर्षी अनेक व्याख्यानमाला घेते. हा उपक्रम चांगला आहे. व्याख्यानमालेतील एक व्याख्यान राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीदिनी २६ जूनला येथील शिवाजी पेठेतील महाविद्यालयात झाले. या व्याख्यानासाठी विद्यापीठाने मंजूर केलेला खर्च आठ हजार. त्या महाविद्यालयाने अवघ्या दोन-अडीच हजार रुपयांत उत्तम व्याख्यान घेतले. त्याचा खर्च विद्यापीठाकडे पाठविला. खरे तर आठ हजारांची मंजुरी असताना अडीच हजारांत व्याख्यान झाले असेल तर ते चांगलेच आहे; परंतु विद्यापीठाच्या संबंधित विभागाच्या प्रमुखांनी त्यावर आक्षेप घेतला. ‘तुम्ही एवढ्या कमी पैशांत ते व्याख्यान घेतलेच कसे?’ अशी विचारणा त्यांच्याकडून झाली व बिल वाढवून देण्यासंबंधीचा सल्ला देण्यात आला. या व्याख्यानासाठी महाविद्यालयाने स्थानिक वक्ता बोलाविल्याने जास्त खर्च झाला नाही; परंतु विद्यापीठाला ते मान्य नव्हते. त्यासंबंधीची माहिती ‘लोकमत’मध्ये ८ आॅगस्टच्या अंकात ‘कुजबुज’ या सदरात प्रसिद्ध झाली. त्यानंतर विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयाकडून स्पष्टीकरण मागवून घेतले. त्या महाविद्यालयाने ‘कुजबुज’मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी शाहू व्याख्यानमालेचा दुरान्वयानेही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण केले. विद्यापीठाने १० नोव्हेंबरला म्हणजे मूळ घटना घडल्यानंतर पाच महिन्यांनी व बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर तीन महिन्यांनी त्याचे स्पष्टीकरण ‘लोकमत’ला पाठविले. ‘बातमीत नमूद केल्याप्रमाणे विद्यापीठ कोणासही अयोग्य, चुकीचा सल्ला देत नाही व दिलेला नाही. त्यामुळे ‘लोकमत’मध्ये दिलेली बातमी असत्य माहितीच्या आधारावर दिली असल्याचे दिसते,’ असे या खुलाशामध्ये विद्यापीठाने म्हटले आहे.