शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

सतेज पाटील यांच्या दक्षिण महाराष्ट्रातील नेतृत्वावर शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:59 IST

विश्वास पाटील लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पुणे शिक्षक मतदारसंघातून प्रा. जयंत आसगावकर यांना विजयी करून कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज ...

विश्वास पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : पुणे शिक्षक मतदारसंघातून प्रा. जयंत आसगावकर यांना विजयी करून कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी पक्षनेतृत्वाला दिलेला शब्द खरा करून दाखविला. या विजयाने काँग्रेसचे दक्षिण महाराष्ट्राचे नेतृत्व म्हणून त्यांच्यावर शिक्कामोर्तब झाले. दिल टाकलेल्या पैलवानासारखी स्थिती झालेल्या काँग्रेसला त्यांनी लढायला आणि जिंकायलाही शिकविल्याचे प्रत्यंतर या निकालाने आले. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे सर्वच जिल्ह्यांत मिळालेले भक्कम पाठबळ हेदेखील या विजयाचे महत्त्वाचे कारण आहे.

दक्षिण महाराष्ट्रात विधानसभेच्या ५८ जागा येतात. त्यामध्ये काँग्रेसचे सध्या पुण्यात दोन, सोलापूर, साताऱ्यात प्रत्येकी एक आणि सांगलीत दोन आमदार आहेत. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेचे चार व आता विधान परिषदेचे दोन असे तब्बल सहा आमदार झाले आहेत. काँग्रेसचा भरभराटीचा काळ होता तेव्हाच एवढी पक्षाची ताकद होती. विधानसभेच्या निवडणुकीतही शून्यावरून चार आमदार निवडून आणण्यात सतेज पाटील यांनी घेतलेले कष्ट कारणीभूत होते. ऋतुराज पाटील, चंद्रकांत जाधव, राजूबाबा आवळे यांच्यासारख्या नव्या चेहऱ्यांना विजयी करण्यासाठी ते पायांना भिंगरी लावून फिरले. तसेच कष्ट त्यांनी आता आसगावकर यांच्या विजयासाठी घेतले. विधानपरिषदेची गेलेली जागा स्वत: लढवून ती खेचून आणली. लोकसभेला ‘आमचं ठरलंय’ अशी कॅचलाईन घेऊन त्यांनी शिवसेनेच्या संजय मंडलिक यांना खासदार केले. त्यानंतर विधानसभेतील आणि आता आसगावकर यांचा विजय अशी एकापाठोपाठ एक विजयाची माळ लावून ‘जिकडे सतेज तिकडे विजय’ असे समीकरण घट्ट केले.

कोल्हापुरात ५ नोव्हेंबरला काँग्रेसच्या मेळाव्यात सतेज पाटील यांनी ‘दोन्ही मतदारसंघांतील एक जागा काँग्रेसने आपल्याकडे घ्यावी, ती निवडून आणण्याची जबाबदारी माझी,’ असा शब्द नेतृत्वाला दिला. त्यानुसार शिक्षक मतदारसंघाची जागा काँग्रेसला मिळाली. या मतदारसंघातून एकूण सहाजण इच्छुक होते; परंतु आसगावकर यांच्या उमेदवारीवर मोहोर उठविल्यावर अन्य पाचजणांना एकत्र करून त्यांना विश्वास दिला व जिल्ह्यात त्यांच्यात मतैक्य घडविले. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून आसगावकर यांना एकमुखी पाठबळ मिळाले. आसगावकर हे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले होते. तशी त्यांची फारशी तयारीही नव्हती आणि त्यांचा चेहराही फारसा परिचित नव्हता; त्यामुळे त्यांच्या मागे जनमत उभे करण्याचे शिवधनुष्य त्यांनी पेलले. ‘तुम्हांला शिक्षक हवा की संस्थाचालक?’ असाही प्रचार झाला; परंतु तो मतपेटीपर्यंत जाणार नाही, याची दक्षता घेतली. जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी स्वत:ची सगळी यंत्रणा उभी केली. आसगावकर उमेदवार असले तरी आपण स्वत: उमेदवार असल्यासारखे ते या निवडणुकीत राबले. त्यांना पहिल्या पसंतीची मते कशी जास्तीत जास्त मिळतील असे प्रयत्न त्यांनी केले. एकदा डोक्यात निवडणूक भिनली की त्यात गुलाल लागेपर्यंत उसंत घ्यायची नाही असा त्यांचा स्वभावच बनला आहे. त्यामुळेच ते नवख्या उमेदवाराला रिंगणात उतरवून विजय खेचून आणू शकले.

या निवडणुकीत त्यांनी पाच जिल्ह्यांत जाऊन दोन-दोन दिवस प्रचाराची राळ उठवून दिली. शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष म्हणून राजकीय जीवनाची सुरुवात करणाऱ्या सतेज यांना त्या निवडणुकीतील संपर्क यावेळेला कामी आला. सांगलीत राज्यमंत्री विश्वजित कदम, पृथ्वीराज पाटील, साताऱ्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पुण्यात कमलताई व्यवहारे, अभय छाजेड, रमेश बागवे, अरविंद शिंदे, मोहन जोशी, आबा बागुल, सोलापुरात आमदार प्रणिती शिंदे व अन्य पदाधिकारी यांच्याशी असलेल्या उत्तम संबंधांचा या निवडणुकीत खूप फायदा झाला. हे सगळ्या नेत्यांनी मनापासून काम केले. त्यामुळेच हा विजय साकारू शकला.