शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर शनिवारी उमटणार मोहर

By admin | Updated: May 8, 2014 12:01 IST

पुणे पदवीधर मतदारसंघ : राजेश पाटील-वाठारकर, सारंग पाटील, अरुण लाड यांची फिल्डिंग

कºहाड पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जुलैच्या पहिल्या दुसर्‍या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच पुणे पदवीधर मतदार संघातील राजकारण जोर धरू लागले आहे. पदवीधर मतदार संघातील राजकारणही तापू लागले आहे. भाजपने सुमारे आठ महिन्यांपूर्वीच उमेदवार निश्चित केला आहे. मात्र, प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचा उमेदवार अजून ठरलेला नाही. शनिवारी मुंबई येथे पक्षाच्या बैठकीत या उमेदवारीवर मोहर लावली जाणार असल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या वर्तुळात सुरू आहे. पुणे पदवीधर मतदारसंघ हा अपवाद वगळता भाजपाचा बालेकिल्ला राहिला आहे. शरद पाटील वगळता इतर कोणाला या बाले किल्ल्याला शह देणे शक्य झालेले नाही. गत निवडणुकीत भाजपाच्या चंद्रकांत पाटील यांनी हा गड पुन्हा ताब्यात घेतला खरा! पण राजेश पाटील-वाठारकरांनी दिलेली कडवी झुंज दुर्लक्षित करण्यासारखी नक्कीच नाही. भाजपाने आमदार चंद्रकांत पाटील यांना गत आठ महिन्यांपूर्वीच उमेदवार म्हणून निश्चित करून आघाडी घेतली आहे. त्यांची प्रचारयंत्रणा वेगात सुरू आहे. याउलट जो जास्त मतदार करेल, त्याला उमेदवारी असे भाष्य करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षांतर्गत इच्छुकांच्यात स्पर्धा लावली आहे. त्यामुळे राजेश पाटील-वाठारकर (कºहाड), सारंग पाटील (कºहाड), अरुण लाड (सांगली), शरद बुट्टे (पुणे) या चार इच्छुकांनी गत वर्षभरात पाच जिल्ह्यांचा हा मतदारसंघ अक्षरश: पिंजून काढला आहे. मीच सर्वाधिक मतदार केल्याचे दावे, हे इच्छुक करीत आहेत. शनिवारी अजित पवारांच्या समोर याचा लेखाजोखा होणार असून, गुणवत्तेच्या जोरावर उमेदवार निवडला जाणार आहे म्हणे! दरम्यान, या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या काही इच्छुकांनीही तयारी केली आहे. राज्यात दोन्ही काँग्रेसची आघाडी आहे. ती पदवीधर मतदार संघसाठीही कायम राहिल्यास काँग्रेसमधील इच्छुक बंडखोरी करण्याची शक्यता आहे. तसेच राष्ट्रवादीतही ‘एक’ उमेदवार उमेदवारी मिळो अथवा न मिळो रिंगणात आहेच, या पवित्र्यात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला भाजपच्या गडाला शह देण्यासाठी विचारपूर्वक उमेदवार निवडावा लागणार, हे निश्चित!