ऑनलाईन शिक्षणासाठी इंटरनेटची गरज असते आणि कोणत्याही शैक्षणिक लिंकवर गेले असता, नको त्या जाहिरातींच्या लिंक, चित्र, व्हिडिओ समोर येतात. विद्यार्थीही कुतूहल, उत्सुकतेपाटी लिंकला खोलतात. त्यामुळे इतर विद्यार्थी, शिक्षकांनाही त्याचा त्रास होतो. पालकांच्या स्मार्टफोनमधून मुलांनी काही महागडे गेम डाऊनलोड केल्याचे प्रकार घडले आहेत. ऑनलाईन शिक्षणाचे तीन-चार तास झाल्यानंतर मुले मोबाईलवर गेम खेळत बसतात. त्यामुळे मोबाईल घेऊन काय करत आहेत. ते काय पाहत आहेत यावर पालकांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे. ऑनलाईन शिक्षण देताना वापरण्यात येणाऱ्या सॉफ्टवेअर अथवा ॲपचे पेड व्हर्जन घेतल्यास त्यामध्ये अधिक सुरक्षितता मिळते.
चौकट
शाळांनी अशी घ्यावी काळजी
ऑनलाईन शिक्षण देण्याकरिता ॲप घेताना ते मान्यताप्राप्त आणि विश्वासाह्य संस्थेचे असावे. लेक्चर सुरू असताना मध्येच काही जाहिराती येतात. त्या टाळण्यासाठी संबंधित ॲपच्या सेटिंगद्वारे संदेश पाठवावा. शासनाने ऑनलाईन शिक्षणासाठी दीक्षा ॲप उपलब्ध करून दिले आहे. शाळांनी त्याचा वापर करावा. खासगी व्यावसायिक ॲप वापरू नयेत अथवा फिल्टरसह वापरणे आवश्यक आहे.
चौकट
असे देखील घडण्याची शक्यता
ऑनलाईन लेक्चर सुरू असताना मध्येच नको ते व्हिडिओ सुरू होतात. हे व्हिडिओ अपलोड होतात अथवा या ॲपवर घाणेरड्या जाहिराती येतात. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण होते. त्यामुळे अशा ॲपमुळे मोठी अडचण निर्माण होत आहे.
चौकट
पालकांनी दक्ष राहण्याची आवश्यकता
संगणक, स्मार्टफोनचा वापर करताना मुलांची बैठक व्यवस्था खुल्या जागेत करावी. सायबर सुरक्षेबाबत आवश्यक ती काळजी घ्यावी. मुलांचे चुकीच्या गोष्टींबाबत समुपदेशन करणे गरजेचे आहे. सोशल मीडिया संबंधित ॲपवर तुम्ही जेसारखे बघता त्याच्या सूचना (सजेश्नस) येतात. सारखे सारखे बघण्यात आलेल्या विषयावरील व्हिडिओ ‘हे तुम्हाला आवडू शकेल’ म्हणून सुचविले जातात. त्यामुळे अनावधानाने नव्हे तर पालक मोबाईलमध्ये जे बघतात त्याच्याच लिंक डाऊनलोडही होतात. अभ्यासासाठी मुलांना देण्यात येणाऱ्या मोबाईल या कारणासाठीही स्वतंत्र असावा. पालकांनी अनावश्यक ॲप मोबाईलमध्ये ठेवू नयेत.