शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
3
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
4
SBI केवळ या नंबर्सवरुन करतं ग्राहकांना फोन; अन्य कोणत्याही क्रमांवरुन कॉल आल्यास व्हा सावध, काय आहे प्रकरण?
5
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
6
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
7
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
8
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
9
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
10
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
11
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
12
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
13
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
15
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
16
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
17
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
18
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
19
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
20
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?

मला वाचवा...तकलादू उपाय नकोत; ‘मास्टर प्लॅन’ गरजेचा

By admin | Updated: February 12, 2015 00:56 IST

रंकाळ्याची आर्त साद

माझ्या काळ्याशार पाण्याची ओंजळ भरून एके काळी कोल्हापूरकरांची मी तहान भागवलीय... बाया-बाप्यापासून अनेकांच्या आयुष्याची सुरुवात व संध्याकाळ माझ्या काठावरच गेलीय... भल्या पहाटे, भर दुपारी माझ्या तटबंदीवरून पोरा-टोरांनी सूर मारून पोहण्याची हौस भागविलंय... अनेक पिढ्यांना माझ्या अंगा-खांद्यावर खेळवलंय... कोल्हापूरकरांचे वैभव म्हणून कित्येक वर्षे मी अभिमानाने मिरवलंय... पण बाबांनो, तुम्ही सुधारला, पण मी आज काळवंडलोय... माझं पाणी पिण्याच्या सोडाच, बघण्याच्याही लायकीचं राहिलेलं नाही... रोज थोडा.. थोडा मी ढासळतोय... उग्र दर्पानं माझा श्वास घुटमळतोय... मी अखेरच्या घटका मोजतोय... माझा दोष तरी काय ? की माझी इतकी प्रतारणा होतेय... खरंच मला अजून जगायचंय... पुढच्या पिढ्यांना खेळवायचंय... करवीरवासीयांनो, मला तुम्ही वाचवाल का ? अशी आर्त साद आपला रंकाळा घालतोय...तकलादू उपाय नकोत; ‘मास्टर प्लॅन’ गरजेचारंकाळा तलावाला गतवैभव आणि सौंदर्य प्राप्त करून देण्याचे काम हाती घेत असताना तकलादू उपाय योजले जाऊ नयेत, अशी अपेक्षा आहे. तलावाचे सौंदर्य का आणि कोणत्या कारणांनी नष्ट झाले याचा तांत्रिक तसेच पर्यावरणीय दृष्टिकोनातून अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. भूगर्भशास्त्राचा अभ्यास तसेच त्यातील गाळ व पाण्याची सद्य:स्थिती याचा आधी अभ्यास होणे आवश्यक आहे. मग पुढच्या दोन-चार वर्षांत त्याचे संवर्धन व सुशोभीकरणाच्या निमित्ताने काय काय करता येईल याचा किमान १५० कोटींचा आराखडा तयार करणे आवश्यक आहे. त्याकरिता निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. तटबंदीचा काही भाग कोसळला म्हणून केवळ त्यासाठी ८८ लाखांचे नुसते एस्टिमेट करून भागणार नाही, तर त्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला तरच कामे होणार आहेत. महानगरपालिका प्रशासन आणि कोल्हापूरकरांनी मनावर घेतले तरच तलावाला ऊर्जितावस्था येऊ शकते. हे प्राधान्याने करावेसर्वांत प्रथम तलावातील पाणी बाहेर पडण्यासाठी असलेले नैसर्गिक व कृत्रिम प्रवाह तत्काळ सुरू केले पाहिजेत. जमिनीखाली गाडलेले आऊटलेट खुले केले पाहिजेत. निकामी झालेले व्हॉल्व्ह तातडीने दुरुस्त केले पाहिजेत. तलावातील पाण्याची कमाल व किमान पातळीचा समतोल साधण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. तलावाच्या अगदी काठावर असलेली काही नारळाची झाडे व त्यांची मुळेही काढली गेली पाहिजेत. ती जर तशीच ठेवली गेली तर भिंतीवरील दाब पुन्हा कायम राहणार आहे.शालिनी पॅलेससमोरील सध्या पडलेली भिंत तसेच त्याच्या आजूबाजूला असलेली भिंत पूर्ण उतरून घेतली पाहिजे. आता नव्यानेभिंत बांधताना पाईलिंग करून पिलर उभे करून मगच भिंत बांधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भिंत बांधताना छिद्रे ठेवली पाहिजेत. तलावाच्या रचनेचा व पाण्याच्या निर्गतीचा आणि सांडपाण्याच्या स्रोतांचा अभ्यास करून भिंतीची रचना केली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सध्या पाण्याची पातळी कमी झाली असल्यामुळे भिंत बांधण्याचे काम मे महिन्यापर्यंत पूर्ण होणे आवश्यक आहे. पावसाळ्यात काम रखडले की ते पुन्हा पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत रखडणार आहे याची जाणीव ठेवावी लागेल. १९७४ मध्ये शालिनी पॅलेससमोर मातीचा भराव टाकून नंतर तेथे दगडी तटबंदी उभारण्यात आली. तलावाच्या मूळ बांधकामाचा हा भाग नाही. मुख्य तलावाच्या बाजूला बांधलेली ही भिंत आहे. चाळीस वर्षे पाण्याच्या लाटांशी संघर्ष केलेल्या या तटबंदीला काठावरील नारळाच्या झाडांनी तडा दिला आहे. तटबंदी उद्ध्वस्त केली आहे. त्यामुळे ही तटबंदी केवळ जोडून चालणार नाही तर ती पूर्णत: नव्याने उभारणे आवश्यक आहे. कोल्हापूर : एकेकाळी काळ्याशार स्वच्छ पाण्याद्वारे मानवी मनाला भुरळ घालणारा आणि पाण्याच्या लाटेबरोबर हळुवार गारवा देणाऱ्या रंकाळा तलावाच्या संवर्धनाकडे महानगरपालिका प्रशासनासह सर्वसामान्य नागरिक, पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते आदी घटकांचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळे तलावाचे नैसर्गिक सौंदर्य नष्ट झाले आहे. गेल्या आठ ते दहा वर्षांपासून रंकाळा तलाव जलपर्णी, त्यात मिसळणारे सांडपाणी यामुळे चर्चेत राहिला, परंतु त्याचे संवर्धन करण्याच्याबाबतीत पराकोटीची उदासीनताच आता त्याच्या मूळ अस्तित्वावर उठली आहे. पाच वर्षांपूर्वी तलावातील जलपर्णीचा विळखा वाढला. कसेबसे राज्य सरकारच्या मेहरबानीने ती काढण्यात यश आले. त्यानंतर तलावातील सांडपाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला. सांडपाणी वळविण्याचा मनपा प्रशासन प्रयत्न करीत असतानाच आता तलावाच्या पश्चिम भागातील तटबंदी कोसळायला लागली आहे. या घटना अचानक घडलेल्या नाहीत, तर केवळ त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही. काहीतरी करून तलावाचे मूळ अस्तित्व टिकविण्यासाठी कोणी प्रयत्न केले नाहीत, म्हणूनच आज या ऐतिहासिक तलावाचे विद्रूपीकरण झाले आहे. रंकाळा तलाव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता तोपर्यंत ठीक होता; पण तो महानगरपालिकेकडे वर्ग झाला आणि त्याच्या सौंदर्याला ग्रहण लागले. महानगरपालिका प्रशासनाकडे जलतज्ज्ञ नाहीत की पर्यावरणतज्ज्ञ नाहीत, अशा अवस्थेत रंकाळा ताब्यात घेण्यात आला; पण त्यानंतरही काही तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तलावाचे संवर्धन करावे, त्याच्यावरील संकटातून मार्ग काढावेत, असे कधी पालिकेच्या अधिकाऱ्यांना वाटले नाही. एवढेच नाही तर तलावाच्या बाहेर पडणारे मार्ग बंद केले तरी कोणाचे लक्ष नव्हते. तलावाचे व्हॉल्व्ह निकामी झाल्याचे कोणाला माहीत नव्हते. मात्र, २००५ मध्ये झालेल्या पावसाने सर्वांचे डोळे उघडले, परंतु त्यानंतरही केवळ उदासीनताच पाहायला मिळत आहे.तलावाचा पूर्वइतिहासकोल्हापूर शहरातील अंबाबाई मंदिरापासून ५५० मीटर्स अंतरावर तलावाचे अस्तित्व आहे.आठव्या शतकात तलावातील कठीण दगडाची खुदाई झाल्याची माहिती उपलब्ध होते. नवव्या शतकात झालेल्या भूकंपामुळे खुदाई केलेल्या ठिकाणी नैसर्गिक पाण्याचे उमाळे लागले.शंकराचा अवतार म्हणून समजल्या गेलेल्या आणि अंबाबाईच्या खास मर्जीतल्या रंकभैरवाचे नाव या तलावाला दिले. तलावाच्या काठावरच रंकभैरव देवाचे मंदिर आहे.चौथे शिवाजी महाराज यांच्या काळात तलावातील पाणी नागरी वस्तीच्या पिण्यासाठी वापर करण्याचा निर्णय घेतला गेला. तत्कालीन संस्थानातील दिवाण महादेवराव बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली तलावाचे बांधकाम सुरू झाले.१८७७ ते १८८२ पर्यंत तलाव बांधकाम सुरू होते. राजर्षी शाहू महाराजांनी या कामात पुढाकार घेतला. तलावाची खोली अंदाजे १५ मीटर, तर तलावाचा परीघ पाच किलोमीटरचा आहे. तलावाच्या परिसरात प्रत्येक वर्षी सरासरी एक हजार मिलिमीटर पाऊस असल्याच्या नोंदी आहेत.तलावाचे बांधकाम चुनेगच्चीत करण्यात आले असून, उत्कृष्ट बांधकामाचा नमुना म्हणून याकडे पाहिले जाते.प्रशासन सुस्तच!शहरातील काही पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन तलावाचे अस्तित्व जपण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या कार्यकर्त्यांनी दोन वर्षांपूर्वी तलावातील पाण्याचे होणारे प्रदूषण, त्यामध्ये मिसळणारे सांडपाणी, तलावाच्या भिंती, तलावात निर्माण होणारी जलपर्णी, पाण्यापासून सुटणारी दुर्गंधी अशा अंगाने अभ्यास करण्याचे ठरविले. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडील निवृत्त अभियंते, आर्किटेक्टस्,पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते यांनी एकत्रितपणे अभ्यास करून एक सविस्तर अहवाल तयार केला होता. त्यामध्ये तलावाचे अस्तित्व जपण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत. यासंबंधी काही सूचना केल्या होत्या; परंतु त्यावर गांभीर्याने विचार करेल तर ते महानगरपालिका प्रशासन कसले? हा अहवाल नंतर तसाच धूळ खात पडला. उपाययोजना करणे मनपाला तरी शक्य झाले नाही. गाळ काढण्याचा निधी गाळातच... तलावातील गाळ काढण्याच्या निमित्ताने काही अधिकाऱ्यांनी महानगरपालिकेचा भरमसाट निधी खर्च केला; परंतु हा निधी गाळातच गेला, असे म्हणण्याची वेळ आली. गाळ काही निघाला नाही, परंतु निधी मात्र खर्च झाला. एका वर्षी वीस लाख रुपये खर्च पचल्यानंतर पुढील वर्षी तो चाळीस लाख रुपये खर्च केला गेला. गाळ काढण्याचे निमित्त झाले आणि पैसे खर्च करण्याचा एक वेगळाच फंडा निघाला.तज्ञ्ज म्हणतात...रंकाळा तलाव हा एकेकाळचे धरण आहे. धरण म्हणूनच त्याचे बांधकाम झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हा तलाव होता तोपर्यंत काठावर वृक्षलागवड झाली नव्हती. नंतर तो महापालिकेच्या ताब्यात आल्यावर उद्यान करतेवेळी ही वृक्षलागवड करण्यात आली. मुळात तेथे असे मोठे वाढणारे वृक्ष लावणे अयोग्य होते. कोणतेही परिणाम त्यावेळी तपासून पाहिले गेले नाहीत. नारळाच्या झाडांची मुळे तटबंदीला भेदत आहेत. त्यामुळे आता तटबंदी कोसळायला लागली आहे. मूळ धरणाची भिंत असलेल्या उत्तर व पूर्व भागात तटबंदी पडलेली नाही. कारण तेथे काठावर वृक्षलागवड झालेली नाही .- डॉ. रविकुमार जाधव चौपाटी उद्यान गेटपासून ते पांढरा घाटदरम्यान शंभर मीटर परिसरात दोन ठिकाणी तटबंदी कोसळली आहे. कोसळलेला भाग तेवढाच दुरुस्त करून चालणार नाही. कारण कोसळलेल्या तटबंदीमुळे त्या परिसरातील संपूर्ण तटबंदी कमकुवत झाली आहे. त्यामुळे सध्याची तटबंदी उतरून घेऊन नव्याने बांधावी लागेल. त्याकरिता पाण्याची सध्याची पातळी कमी करावी लागेल. तटबंदी करण्यापूर्वी उद्यानाकडील भाग माचवून घेतला पाहिजे. जरी तटबंदी मजबूत केली, तरी त्या परिसरातून भविष्यकाळात अवजड वाहनांची वाहतूक होणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे. - जीवन बोडके, आर्किटेक्ट भिंत भुसभुसीत का झाली?