कोल्हापूर : येथील मार्केट यार्ड परिसरात सुमारे ६० फूट उंचावर निलगिरीच्या झाडावर पतंगाच्या मांज्यात अडकलेल्या दुर्मिळ पक्ष्याची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली. तो ग्रे हॉर्नबिल जातीचा दुर्मिळ पक्षी आहे. जखमी झाल्याने त्याला पांजरपोळ येथे उपचारासाठी दाखल केले. यामुळे त्या पक्ष्याला जीवदान मिळाले.
मार्केट यार्डमधील टेंबे रोड परिसरात निलगिरीच्या झाडावरील मांज्यात पक्षी अडकल्याची माहिती अग्निशमन दलाच्या प्रशासनाकडे प्राप्त झाली. त्यानंतर जवान नवनाथ साबळे, जयवंत डकरे, माणिक कुंभार, प्रमोद मोरे, अजित मळेकर यांचे पथक सर्व यंत्रसामग्रीसह दाखल झाले. त्यांनी ६० फूट उंचावर अडकलेल्या त्या पक्ष्याची सुखरूप सुटका केली. मांज्यात अडकल्याने त्याच्या पंखाला जखम झाल्याचे निदर्शनास आले. यामुळे उपचारासाठी पांजरपोळ येथे त्याला दाखल करण्यात आले.
फोटो : ३१०५२०२१-कोल- पक्षी
कोल्हापुरातील मार्केट यार्ड परिसरात मांज्यात अडकलेल्या दुर्मिळ पक्ष्याची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली.