शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळच्या पोलीस पुत्राचा खून प्रेमसंबंधातून

By admin | Updated: July 15, 2017 00:05 IST

शिरोळच्या पोलीस पुत्राचा खून प्रेमसंबंधातून

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : शिरोळचा पोलीसपुत्र असलेल्या शब्बीर बोजगर याच्या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. हा खून प्रेमसंबंधातून झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. इचलकरंजीच्या स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पोलिसांनी याप्रकरणी सांगलीतील संशयित पिता-पुत्रासह तिघांना येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. रोहित रवींद्र नगरकर (वय २८), रवींद्र जीवन नगरकर (५५) व आकाश जफान माच्छरे (२५, तिघे रा. श्यामनगर, सांगली) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना निपाणी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. बोजगरचा हणबरवाडी-कर्नाटक येथे ११ जुलैला निर्घृण खून झाला होता. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटार (एमएच ०१ एएच ६४५८) व (एमएच १० बीए ५३२२) अशा दोन गाड्या जप्त केल्या आहेत. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, येथील शहापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या शब्बीर बोजगर यांचा मुलगा शाहरुख याच्या खून प्रकरणाचा येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून तपास सुरू होता. पथकाला मिळालेल्या माहितीवरून वरील तिघा संशयितांना अटक केली. याबाबत निपाणी पोलिसांना कळवून संशयितांना पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यावेळी संशयित आरोपींचे नातेवाईक ताबा देण्यास विरोध करीत असल्याने काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता. त्यातून मार्ग काढत निपाणी पोलिस संशयितांना घेऊन गेले. दरम्यान, शाहरुख याचे सांगलीतील एका युवतीशी प्रेमसंबंध होते. काही दिवसांनंतर शाहरुखला संबंधित युवतीचा पूर्वी विवाह झाला असल्याचे समजले. त्यामुळे दोघांच्यात वादावादीचे प्रसंग घडले होते. त्यानंतर युवतीने सहा महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. हा राग मनात धरून युवतीचे वडील व भाऊ यांनी शाहरूखचा गेम करण्याचे ठरविले होते. त्यानुसार ते शाहरुखच्या मागावर होते. ११ जुलैला तिघांनी शाहरुखचा काटा काढला. त्याचे शिवाजी विद्यापीठामधून अपहरण केले. त्याला हणबरवाडी परिसरात नेऊन तेथे त्याचा खून केला, असे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे, अशी माहिती पथकाचे प्रमुख शहाजी निकम यांनी दिली.आणखीन काहीजणांचा समावेश?घटनेची तीव्रता व घटनास्थळावरील परिस्थिती, तसेच गुन्ह्यामध्ये वापरलेल्या दोन कार हस्तगत केल्याने यामध्ये आणखीन काहीजणांचा समावेश असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त होत आहे. त्या अनुषंगानेही पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.सुशिक्षित कुटुंबाकडून रागातून कृत्यया प्रकरणातील संशयित नगरकर कुटुंबीय हे सुशिक्षित आहेत. सुमित व रोहित दोघे उच्चशिक्षित, तर वडील सुशिक्षित आहेत. तसेच त्यांची मृत बहीणही उच्चशिक्षित होती; पण बहिणीच्या मृत्यूमुळे रागाच्या भरात हे कृत्य घडले.फेक अकाऊंट काढून शाहरुखला ओढले जाळ्यातगेल्या तीन महिन्यांपासून संशयितांपैकी एकाने सोशल मीडियावर फेक (बनावट) अकाऊंट काढून त्या माध्यमातून तो शाहरुख याच्याशी चॅटिंग करीत होता. त्यातून त्यांचे मैत्रीचे संबंध वाढून त्याला हणबरवाडी परिसरात बोलावून घेऊन त्याचा गेम केल्याची माहितीही तपासात पुढे येत आहे.एकाच कुटुंबातील तिघे ताब्यातया खून प्रकरणात वडिलांसह दोन मुले व एक मुलाचा मित्र असे चौघेजण पोलिसांच्या ताब्यात आहेत. निपाणी पोलिसांनी सुमित नगरकर याला गुरुवारी (दि. १३) ताब्यात घेतले आहे. तर त्याचा भाऊ रोहित, वडील रवींद्र नगरकर व मित्र आकाश माच्छरे या तिघांना इचलकरंजीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने ताब्यात घेतले.