शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

नीलम गोऱ्हेंसमोरच शिवसैनिकास चोपले

By admin | Updated: January 11, 2016 01:11 IST

बंदोडेंसह तिघांवर गुन्हा : वाद उफाळला

कोल्हापूर : कोल्हापूर शिवसेनेतील अंतर्गत वाद रविवारी पुन्हा उफाळून आला. शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे दुपारी साडेचार वाजता करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी मंदिरात गेल्या होत्या. यावेळी कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी साहेबांच्या विरोधात काम करतोस असे म्हणून रणजित सर्जेराव आयरेकर (वय ३७, रा. आयरेकर गल्ली, रंकाळा स्टँड, कोल्हापूर) यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या प्रकाराने मंदिराच्या आतील भागात काहीकाळ गोंधळ निर्माण झाला. आमदार गोऱ्हे यांनी कार्यकर्त्यांच्या हातून आयरेकर यांची सुटका केली.याप्रकरणी आयरेकर यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आमदार राजेश क्षीरसागर यांचे स्वीय साहायक राहुल बंदोडे, कार्यकर्ते सुनील जाधव व उमेश रेळेकर यांच्याविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी कलम ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे (शिवीगाळ व मारहाण) गुन्हा दाखल केला.दुपारी साडेचारच्या सुमारास नीलम गोऱ्हे या अंबाबाई दर्शनासाठी गेल्या होत्या. यावेळी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. रणजित आयरेकर हेही या ठिकाणी उपस्थित होते. दरम्यान, राहुल बंदोडे, सुनील जाधव, उमेश रेळेकर यांनी आयरेकर यांना तू आमच्या नेत्याच्या विरोधात काम करतोस, असे म्हणून शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. रविवार असल्याने अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती. थेट मंदिरातच मारहाणीचा प्रकार पाहून भाविक भीतीने सैरावैरा पळत सुटले. आमदार गोऱ्हे यांनी कार्यकर्त्यांच्या हातून आयरेकर यांची सुटका केली. त्यानंतर आयरेकर यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. (प्रतिनिधी)अंबाबाई मंदिरातील प्रकार हा वैयक्तिक वादातून झालेला आहे. त्याचा पक्षाशी काहीही संबंध नाही. - संजय पवार,शिवसेना जिल्हाप्रमुख