शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
2
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
3
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"मला सतत वकिलांचे फोन येताहेत, पण माझी एक अट..."; सोनमच्या भावाने स्पष्टच सांगितलं
5
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
6
AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली
7
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता; मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देऊ शकतं मोठं गिफ्ट
8
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
9
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिराजवळ भीषण अपघात, दोन ठार, चार जखमी
10
Video: फरार विजय मल्ला अन् ललित मोदीची लंडनमध्ये ग्रँड पार्टी; ख्रिस गेलसह अनेकजण उपस्थित
11
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
12
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
13
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल
14
ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
15
भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल
16
Kandenavami 2025 : शास्त्रात नसूनही आज शास्त्र समजून केली जाते कांदेनवमी; घरोघरी रंगतो कांदेभजीचा फक्कड बेत!
17
चीनमध्ये जिनपिंग पर्व संपुष्टात? १६ दिवसांपासून बेपत्ता; सत्तेतून बेदखल होण्याची चिन्हे....
18
"राक्षस मोकाट फिरतायेत...", मनसेची अमराठी हॉटेल मालकाला मारहाण; बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट
19
एक मिनिटात तत्काळ तिकीट, रेल्वेच्या नव्या नियमानंतर काढली अशी पळवाट, टेलिग्रामवर रॅकेट सक्रिय
20
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त

‘एमपीएससी’मध्ये सांगलीची बाजी

By admin | Updated: April 7, 2015 01:16 IST

एकोणीस विद्यार्थ्यांचे यश : स्पर्धा परीक्षेतील यशासाठी धडपडणाऱ्यांनाही मिळाली ऊर्जा

सांगली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) राजपत्रित अधिकारी ‘वर्ग एक’ आणि ‘वर्ग दोन’च्या पदांसाठी झालेल्या राज्यसेवा परीक्षेत सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. जिल्ह्यातील एकोणीस विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. राज्यसेवा मुख्य परीक्षा जून २०१४ मध्ये घेण्यात आली होती. त्यानंतर जानेवारी २०१५ मध्ये विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात येऊन रविवारी सायंकाळी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये सांगलीतील कर्मवीर स्पर्धा परीक्षा प्रबोधिनीतील तेरा विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. यामध्ये नंदा पाराजे (कुपवाड) यांची पोलीस उपअधीक्षकपदी निवड झाली आहे. तसेच मिताली संचेती (पोलीस उपअधीक्षक ), तृप्ती चव्हाण (राज्य उत्पादन शुल्क विभाग उपअधीक्षक), श्वेता संचेती (तहसीलदार), अमित निकम (नायब तहसीलदार ), आस्मा मुजावर (नायब तहसीलदार), आनंदराव देवकर (नायब तहसीलदार), रमेश रुणवाल (गटविकास अधिकारी), कमलेशकुमार जैन (नायब तहसीलदार), सुधीर सोनवणे (नायब तहसीलदार), चंद्रकांत गुणाले (नायब तहसीलदार), प्रवीण पाटील (गटविकास अधिकारी) यांनीही यश मिळविले आहे.वाळवा तालुक्यातील कामेरी येथील रणजित महादेव पाटील यांची सहायक निबंधकपदी, इस्लामपूर येथील राजारामबापू ज्ञानप्रबोधिनीची विद्यार्थिनी प्रज्ञा विजयसिंह देशमुख यांची सहायक गटविकास अधिकारीपदी, तर फार्णेवाडी (बोरगाव) येथील योगेश भूपाल जमदाडे यांची नायब तहसीलदारपदी निवड झाली. तासगाव येथील विजय तानाजी पाटील यांची उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून निवड झाली आहे. त्याचप्रमाणे आष्टा येथील नेताजी स्पर्धा परीक्षा प्रबोधिनीतील धनश्री यादव (नायब तहसीलदार), अमोल जाधव (गटविकास अधिकारी), प्रियांका सावंत (भूमी अभिलेख अधिकारी) यांनीही यश मिळवले. विविध क्षेत्रातून या यशस्वी विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. स्पर्धा परीक्षेत सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाने उत्साहाचे वातावरणही निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)