शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

सांगली, मिरजेतील तिबेटियन, नेपाळी परतले

By admin | Updated: April 27, 2015 00:15 IST

चार पर्यटक सुखरूप : जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष

सांगली : शहरात खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करणारे (चायनीज), तिबेटियन स्वेटर विक्रेते कालच नेपाळला रवाना झाले आहेत. त्यामुळे चायनीज विक्रीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, नेपाळमध्ये गेलेले सांगलीतील चार पर्यटक सुखरुप असल्याचे वृत्त असून, त्यांना शिबिरामध्ये ठेवण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती निवारण कक्ष सुरु करण्यात आला असून यामध्ये नव्याने नोंदणी मात्र झालेली नाही.सांगली शहरात चायनीज खाद्यपदार्थांची विक्री करणारे व स्वेटर विक्रेते असे सुमारे शंभरावर आहेत. यामधील सुमारे तीस ते चाळीस जण कालच नेपाळला रवाना झाले आहेत. चायनीज विक्रेत्यांमध्ये तरुणांचा सहभाग अधिक आहे. हे तरुण स्थानिक चायनीज विक्रेत्यांकडे काम करतात. त्याचबरोबर स्वेटर विक्री सध्या बंद असली तरी आजुबाजूच्या यात्रा, उत्सवात ते विक्री करीत असतात. शनिवारी नेपाळमध्ये भूकंप झाल्याचे वृत्त समजताच नेपाळी व तिबेटियन नागरिक तात्काळ परतले आहेत. काही कामगार आपल्या पगाराची रक्कम आगाऊ घेऊन रवाना झाले आहेत. त्यामुळे शहरातील चायनीज विक्री व्यवसायावर परिणाम झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालया- बरोबरच सर्व तहसील कार्यालयात शनिवारपासूनच आपत्ती निवारण कक्ष उघडण्यात आला आहे. या कक्षाकडून ट्रॅव्हल एजन्सीजकडे संपर्क साधण्यात आला आहे. मात्र नव्याने कोणी बेपत्ता किंवा संपर्काविना असल्याचे आढळले नाही. नेपाळमध्ये ट्रेकिंगसाठी सांगलीतील चार पर्यटक गेले होते. त्यांच्याशी संपर्क झाला असून, ते सुखरुप असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामध्ये अमोल अप्पासाहेब पाटील (रा. महसूल कॉलनी, शामरावनगर), सचिन उदगावे (वारणाली वसाहत), स्वप्निल कुंभारकर व त्यांची पत्नी मानसी कुंभारकर (रा. गव्हर्मेंट कॉलनी) यांचा समावेश आहे. त्यांना सध्या भारताकडून सुरु केलेल्या निवास शिबिरामध्ये आश्रय देण्यात आला असून, लवकरच त्यांना दिल्लीत आणण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)भूकंपग्रस्तांसाठी मिरजेतील अधिकाऱ्याची सेवानेपाळमधील भूकंपामध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी लष्कराच्या हवाई दलात विंग कमांडर म्हणून कार्यरत असलेले मिरजेचे मनीष मैंदर्गी हे रात्रं-दिवस सेवा देत आहेत. भारत सरकारने नेमलेल्या दहा पथकांतील एका पथकाचे नेतृत्व मैंदर्गी यांच्याकडे आहे. मैंदर्गी हे गेल्या पंधरा वर्षांपासून हवाई दलात आहेत. सध्या ते चंदीगड येथे सेवेत आहेत. नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी काल दहा लष्कराची पथके नेमण्यात आली. त्यामधील एका पथकाचे नेतृत्व मैंदर्गी यांच्याकडे असून, काल दुपारीच ते ५५० प्रवाशांच्या क्षमतेचे लष्करी विमान घेऊन काठमांडूला रवाना झाले. काल रात्री उशिरापर्यंत त्यांनी काठमांडू ते दिल्ली अशा चार खेपा करून सुमारे दीड हजार भारतीयांची सुटका केली आहे. आणखी चार दिवस ही सेवा सुरू राहणार असल्याचे त्यांनी मिरजेतील आपल्या नातेवाईकांना कळवले आहे.