शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

सांगली-कोल्हापूर रस्ता टोलमुक्तच हवा

By admin | Updated: June 4, 2015 00:01 IST

जयंत पाटील : सरकारची अवस्था दोलायमान

सांगली : निवडणुकीच्या काळात सवंग लोकप्रियतेसाठी अनेक घोषणा भाजपने केल्या होत्या. संपूर्ण टोलमुक्तीच्या घोषणेची अंमलबजावणी अजून झालेली नाही. सांगली-कोल्हापूरसह राज्यातील सर्वच रस्ते त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे टोलमुक्त करावेत, असे मत माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. ते म्हणाले की, सरकारने निवडणुकीत लोकांसमोर सवंग लोकप्रियतेसाठी अनेक प्रकारच्या घोषणा केल्या. घोषणा करणे सोपे असते, त्याची अंमलबजावणी करताना कस लागतो. राज्याची सध्याची आर्थिक स्थिती कमकुवत आहे. अशी स्थिती असतानाच सरकारने अनेक घोषणा केल्या. आर्थिक डोलारा सांभाळताना ते आता अडचणीत सापडले आहेत. सरकारची सध्याची अवस्थाच दोलायमान झाली आहे. सध्याचा टोलमुक्तीचा निर्णय हा केवळ छोट्या रस्त्यांपुरता मर्यादित आहे. छोट्या वाहनांना टोलमुक्ती मिळाली असली तरी, प्रत्यक्षात संपूर्ण टोलमुक्तीची घोषणा त्यांनी केल्यामुळे ती त्यांनी पाळली पाहिजे. सांगली-कोल्हापूर रस्ता टोलमुक्तच असला पाहिजे. कोल्हापूरबाबतही आमची तीच स्पष्ट भूमिका आहे. महामार्गांचे ठेके राष्ट्रवादीच्या लोकांकडे आहेत, अशी टीका केली जात आहे. वास्तविक अशा सर्वच ठेक्यांची कागदपत्रे तपासावीत. आम्हालाही कळू द्या, कोणाचे ठेके आहेत ते, असेही ते म्हणाले.आरक्षणाबाबत ते म्हणाले की, सरकारने धनगर समाजाबाबत अन्याय केला आहे. केंद्र शासनाने दिलेल्या प्रस्तावावर अनुकूल निर्णय राज्य सरकारने घेतला नाही. यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या एका पत्राला केंद्रीय आदिवासी मंत्रालयाने दिलेल्या उत्तरातून या गोष्टी समोर आल्या आहेत. निवडणुकीपूर्वी त्यांनी आरक्षणाबाबत दिलेला शब्द पाळलेला नाही. मराठा व अन्य समाजाचे आरक्षणाचे प्रलंबित प्रश्न तसेच आहेत. त्याबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही. (प्रतिनिधी)भूविकास बँका टिकल्या पाहिजेतराज्यातील भूविकास बँका टिकल्या पाहिजेत, अशी मागणी आता जोर धरत आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या या बॅँका असल्यामुळे सरकारने त्यांना मदत करणे अपेक्षित होते. आर्थिक मदत देऊन भूविकास बॅँका टिकविण्याची गरज आहे. आघाडी सरकारच्या काळात भूविकास बॅँकांबाबत केवळ समिती नियुक्त करून त्याची चर्चा सुरू होती, तेव्हा भाजपच्या लोकांनी सरकारवर टीका केली होती. त्यामुळे या बॅँका टिकविण्याच्या दृष्टीने त्यांनी निर्णय घ्यावा, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.