शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यातील सभापती निवडीत समझोता एक्स्प्रेस

By admin | Updated: September 15, 2014 00:57 IST

हातकणंगले, पन्हाळा निवडी चिठ्ठीवर : काँग्रेसचे ६, राष्ट्रवादीचे ४ सभापती, शिरोळमध्ये स्वाभिमानी

कोल्हापूर : जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापती निवडीत काँग्रेसने बारा पैकी सहा पंचायत समित्या आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, तर स्वाभिमानीने शिरोळची सत्ता कायम ठेवली, तर ‘जनसुराज्य’ला पन्हाळ्याची सत्ता चिठ्ठीवर मिळाली. चंदगडमध्ये माजी आमदार नरसिंगराव पाटील गटाला सभापती, तर माजी मंत्री भरमूअण्णा पाटील गटाला उपसभापती पद मिळाले. राधानगरी-भुदरगड या दोन तालुक्यांत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी कायम राहिली. या दोन्हीही तालुक्यांत राष्ट्रवादीकडे सभापतिपद, तर उपसभापतिपद काँग्रेसकडे राखून समझोता एक्स्प्रेस धावली. कागलमध्ये संजय घाटगे गटाने सभापतिपदासाठी बाजी मारली, तर मंडलिक गटाचे भूषण पाटील यांची उपसभापती म्हणून फेरनिवड केली. गडहिंग्लजमध्येही राष्ट्रवादीने बाजी मारली. करवीर, गगनबावडामध्ये कॉँग्रेसने सभापती पद राखले. हातकणंगले आणि पन्हाळा सभापतिपदासाठी रस्सीखेच झाली. दोन्हीही ठिकाणी समान बलाबल झाले. हातकणंगलेत कॉँग्रेसने सत्ता मिळविली, तर पन्हाळ्यावर जनसुराज्यने सत्ता हस्तगत केली. शाहूवाडीमध्ये संख्याबळ असतानाही सत्यजित पाटील गटाला सभापतिपदावर हक्क मिळवता आला नाही. तेथे सत्ता नसतानाही कॉँग्रेसने बाजी मारली. आजऱ्यातही दोन्ही कॉँग्रेसची समझोता एक्स्प्रेस धावली. येथे काँग्रेसला उपसभापतिपद देऊन मुश्रीफ गटाने राष्ट्रवादीची सत्ता आणली. (सविस्तर वृत्त/ हॅलो पान १)