शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

संभाजीनगर मंडळ करणार अवयवदान जागृती

By admin | Updated: August 31, 2016 00:37 IST

ध्वनी प्रदूषणास विरोध : उत्सव काळातील जमा निधीतून अनेक सामाजिक उपक्रम

कोल्हापूर : विधायक गणेशोत्सवाची परंपरा राखणाऱ्या संभाजी नगर तरुण मंडळाने उत्सवनिधीतून सामाजिक कार्याची परंपरा कायम राखली आहे. ‘नो मोअर डॉल्बी’चा संदेश दिलेल्या या मंडळाने यंदाच्या उत्सवात अवयवदान जागृतीची मोहीम हाती घेतली आहे. प्रदूषण रोखण्यासाठी गतवर्षीपासून मंडळाने गणेशमूर्ती विसर्जित न करण्याचा निर्णय घेतला आहे. संभाजीनगर तरुण मंडळातर्फे साजरा केल्या जाणाऱ्या गणेशोत्सवाचे यंदाचे ७० वे वर्ष आहे. मंडळातर्फे दरवर्षी एका सामाजिक विषयाला अनुसरून कार्य केले जाते. या मंडळाची साडेसात फूट उंचीची गणेशमूर्ती शाडूपासून बनविली जाते. हा गणपती शहरातील प्रमुख गणपतींपैकी एक असून तो ‘नवसाला पावणारा गणपती’ म्हणून प्रसिद्ध आहे. उत्सवकाळात मंडळाकडे जवळपास दोन ट्रक नारळ जमा होतात. रेसकोर्सपासून पुढे आपण यायला निघालो की, रस्त्याच्या दुभाजकांमध्ये सुंदर फुलांच्या लहान-लहान झाडींनी रस्त्याचे रूपच पालटून गेले आहे. ही किमया केली आहे संभाजीनगर तरुण मंडळाने. उत्सवातून जमा होणाऱ्या निधीतून व आयडियल स्पोर्टस् क्लबच्या विद्यमाने शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ११ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. बालकल्याण संकुल, चेतना विकास मंदिर या संस्थांसह विविध शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांचा शालेय खर्च मंडळ उचलते. मंडळातर्फे यावर्षी उत्सवकाळात अवयवदान अभियान राबविण्यात येणार आहे. त्याची सुरुवात म्हणून मंडळाचे कार्यकर्ते अवयव दानचे अर्ज भरणार आहेत. याशिवाय स्क्रीनवरून अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित करणारी चित्रफीत दाखविण्यात येणार आहे. तसेच नागरिकांना माहितीपत्रकाचे वाटप करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)मंडळाची विधायक कामेउत्सव काळात २१०० रोपांचे वाटपबेटी बचाओ अभियान ‘नो मोर डॉल्बी’ अभियान खड्ड्यांच्या प्रश्नांवर लक्ष वेधलेउत्सवातून सीमा लढ्याला पाठबळपूर ओसरल्यानंतर पूरग्रस्त भागात औषध फवारणीशस्त्र प्रदर्शन महादेव मंदिराची उभारणी होय, आम्ही डॉल्बी लावत नाही