शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

राजे गटाला जागेसाठी समरजित घाटगे आग्रही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या राजकारणात आतापर्यंत स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांना घेऊनच आपण पॅनलची बांधणी केली. गेली पंधरा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या राजकारणात आतापर्यंत स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांना घेऊनच आपण पॅनलची बांधणी केली. गेली पंधरा वर्षे राजे गटाला संघात प्रतिनिधित्व मिळालेले नाही. आता आम्हाला न्याय देणार नसाल तर कार्यकर्ते माझेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासमोर स्पष्ट केले.

महाडिक यांनी शुक्रवारी सकाळी समरजित घाटगे यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानी जाऊन भेट घेऊन सत्तारूढ आघाडीसोबत राहण्याची विनंती केली. यावर, आम्हाला सामान्य कार्यकर्त्याला ‘गोकुळ’मध्ये संधी द्यायची असल्याने नवोदिता घाटगे यांनी अर्ज भरला नाही. कोल्हापूर दक्षिण, कागल व एकूणच जिल्ह्यात राजे गटाला मानणारे शंभरहून अधिक ठराव आहेत. त्यामुळे गटाला एक जागा द्यावी. जर उमेदवारीचा विचार करणार नसाल तर कार्यकर्ते माझे ऐकतीलच असे सांगता येणार नसल्याचे समरजित घाटगे यांनी सांगितले. दिल्लीला गेल्यानंतर कार्यकर्त्यांनी परस्पर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. येत्या दोन दिवसांत सगळ्यांशी चर्चा करणार असल्याचे घाटगे यांनी सांगितले.

कोट-

राजे गटाला जागा मिळावी, यासाठी महादेवराव महाडिक यांना सांगितले. उमेदवारी दिली नाही तर कार्यकर्ते माझे ऐकतील की नाही याबाबत शंका असल्याचे आपण महाडिक यांना सांगितले आहे.

- समरजित घाटगे (जिल्हाध्यक्ष, भाजप)

फोटो ओळी : कोल्हापुरात ‘गोकुळ’ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी महादेवराव महाडिक यांनी समरजित घाटगे यांची निवासस्थानी भेट घेतली. (फोटो- १६०४२०२१-कोल-गोकुळ०१)