शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

न झालेल्या सत्काराची खासदारांना सल

By admin | Updated: June 11, 2016 00:29 IST

राष्ट्रवादीचा वर्धापनदिन : कार्यक्रमात महाडिक यांच्यावर कौतुकाचा वर्षाव

कोल्हापूर : देशभरात साडेपाचशेहून अधिक खासदारांमध्ये टॉप थ्री क्रमांक पटकाविल्याने दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी आपला गौरव झाला; पण मतदारसंघात साधी दखलही घेतली नसल्याची सल खासदार धनंजय महाडिक यांनी बोलून दाखविली. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी पक्षांतर्गत राजकारणावर नाराजी व्यक्त केली; पण सर्वच वक्त्यांनी महाडिक यांच्यावर कौतुकाचा वर्षावच केला. संसदेत उभे राहून प्रश्न उपस्थित करणे एवढे सोपे नसल्याचे सांगत माजी खासदार निवेदिता माने म्हणाल्या, महाडिक यांचे अभ्यासपूर्ण प्रश्न व प्रश्नांविषयीची आपुलकी पाहून पक्षातील कार्यकर्त्यांचा ऊर भरून येतो. बास्केट पूल, कोकण रेल्वेबाबत त्यांनी केलेले काम निश्चितच कौतुकास्पद आहे. राष्ट्रवादीचे खासदार पहिल्या तीनमध्ये येतात, याचा आम्हाला अभिमान आहे. आगामी काळात केंद्र अथवा राज्य पातळीवरील नेत्यांच्या हस्ते महाडिक यांचा सत्कार करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. बास्केट पूल म्हणजे काय ते समजावून सांगा, असा टोला जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी हाणला. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत २५ जून रोजी केशवराव भोसले नाट्यगृह येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंगणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. जिल्हा परिषद निवडणुकीत खासदार महाडिक यांनी स्वत: पुढाकार घेऊन पक्षाच्या उमेदवारांना ताकद द्यावी, अशी मागणी प्रदीप पाटील यांनी केली. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवानंद माळी यांनी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यावर टीका केली. जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे यांनी स्वागत केले. जिल्हा बॅँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, ‘गोकुळ’चे संचालक रामराजे कुपेकर, राष्ट्रवादीचे खजानिस अरुण इंगवले, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, महिला जिल्हाध्यक्ष संगीता खाडे, युवक राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष रोहित पाटील, बी. एन. पाटील-मुगळीकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावरजिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी पक्षाने केली आहे. ऐनवेळी पक्षश्रेष्ठींकडून आदेश आल्यास मित्रपक्षाशी युतीचा विचार केला जाईल; पण कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेवर पक्षाचा झेंडा फडकवणारच असा निर्धार ए. वाय. पाटील यांनी केला. चार-पाच महिन्यांत राजकीय भूकंपभाजपचे द्वेषाचे राजकारण सुरू असून मुंबई महापालिका निवडणुकीनंतर राज्यात राजकीय भूकंप होईल, असे भाकीत महाडिक यांनी केले.