शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

एस. टी.साठी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे : कोपार्डे व कुडित्रे येथे शिक्षणासाठी येणाऱ्या महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांना येण्या-जाण्यासाठी एस. टी.च्या फेऱ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपार्डे : कोपार्डे व कुडित्रे येथे शिक्षणासाठी येणाऱ्या महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांना येण्या-जाण्यासाठी एस. टी.च्या फेऱ्या वेळेत नसल्याने जीव धोक्यात घालून एस. टी. बस पकडावी लागत आहे. सकाळी ११ ते दुपारी १ या दरम्यान महाविद्यालय सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी वेळेत एस. टी. बस नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.

करवीर, पन्हाळा, गगनबावडा व शाहूवाडी या चार तालुक्यांमधील मुले, मुली कोपार्डे येथे असलेल्या स. ब. खाडे महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र व कुंभी कासारी कारखान्यावर असलेल्या श्रीराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, डी. सी. नरके ज्युनिअर कॉलेज तसेच अनेक संगणक प्रशिक्षण देणाऱ्या क्लासेससाठी मोठ्या संख्येने येत असतात. दररोज एक ते दीड हजार विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात.

ग्रामीण भागातून येणाऱ्या या मुलांना वेळेत महाविद्यालय व शाळेत पोहोचण्यासाठी व सुटल्यानंतर घरी पोहोचण्यासाठी एस. टी.कडून वेळापत्रकाचे नियोजन केलेले नसल्याने गैरसोय होत आहे. मुला-मुलींना सुट्टी झाल्यानंतर कोपार्डे येथील सांगरूळ फाट्यावर बससाठी यावे लागते. एखादी एस. टी. कोल्हापूरहून येताना दिसताच ती पकडण्यासाठी मुली जीव धोक्यात घालून धाव घेतात.

..........

शाळा सुटताना एस. टी.ची फेरी असावी

ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी सकाळी पाच वाजल्यापासून शाळेच्या वाटेवर असतात. तसेच सुटल्यानंतर एस. टी. वेळेत मिळाली नाही तर घरी पोहोचण्यासाठी दुपारी दोन ते तीन वाजतात. यासाठी शाळा सुटण्याच्या वेळेत एस. टी. फेऱ्यांचे नियोजन करण्याची मागणी होत आहे.

शिक्षक आमदारांनी लक्ष घालावे

सांगरूळ शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. जयंत आसगावकर हे शिक्षक आमदार झाले आहेत. त्यांच्या संस्थेत शिक्षणासाठी येणाऱ्यांची संख्या ८० टक्के आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची एस. टी.साठी होणारी परवड थांबविण्यासाठी आसगावकर यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.

(फोटो) २२ कोपार्डे

कोपार्डे येथे सांगरूळ फाट्यावर महाविद्यालय व शाळकरी मुलींची एस. टी. पकडण्यासाठी जीवघेणी धडपड सुरू असते.