शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
2
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
3
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
4
१२ कोटी रुपये, BMW आणि मुंबईत घर... पोटगीची मागणी ऐकून सुप्रीम कोर्ट म्हणालं,'तू कमवत का नाही?'
5
Ajit Pawar Birthday: अजित पवारांचा असाही एक कार्यकर्ता, ११ एकर शेतजमिनीवर दादांचे चित्र रेखाटून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
6
२ मिनिटांत ₹१००० कोटींचा नफा; 'या' कंपनीच्या शेअरनं केली कमाल, मालकासह गुंतवणूकदारही मालमाल
7
सावधान...! १७ रुपयांपर्यंत घसरू शकतो या बँकेचा शेअर, २-२ तज्ज्ञांनी दिलाय विक्रीचा सल्ला; जाणून घ्या
8
मस्करीची कुस्करी! मी पडले तर तू मला वाचवशील? नवऱ्याला प्रश्न विचारला, कठड्यावरुन पाय घसरला
9
“माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिंमत CM फडणवीस यांच्यात नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
11
वालाचं बिरडं आणि डाळिंब्यांची उसळ यात आहे छोटासा फरक; श्रावण विशेष पारंपरिक रेसेपी 
12
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
13
Post Office मध्ये जमा करा १ लाख, मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स व्याज; चेक करा डिटेल्स
14
प्राजक्ता माळीसोबत फोटो हवा म्हणून त्याने लिफ्टच थांबवली, पुढे काय घडलं? Video व्हायरल
15
कसोटीत सर्वाधिक मेडन ओव्हर्स टाकणारे टॉप ५ भारतीय गोलंदाज!
16
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
17
अदानी-महिंद्रासह दिग्गज स्टॉक्स गडगडले! सेन्सेक्स-निफ्टी सपाट; मात्र 'या' शेअरने केली कमाल!
18
'गाढवाचं लग्न'मधील सावळ्या कुंभाराच्या खऱ्या गंगीला पाहिलंत का?, एकेकाळी होती प्रसिद्ध अभिनेत्री
19
कोंढव्यातील ‘त्या’ तरुणीवर गुन्हा दाखल; खोटी माहिती, पुरावे तयार करून पोलिसांची केली दिशाभूल
20
₹१५ वरुन ₹४५५ वर ट्रेड करतोय 'हा' शेअर; जोरदार तेजी, आता मोठा Whiskey ब्रँड खरेदी करण्याची तयारी

चाके गतिमान करण्यासाठी एस. टी.ला ‘पॅकेज टूर’चा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:25 IST

कोल्हापूर : कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर राज्य शासनाच्या अंगिकृत असलेले एस. टी. महामंडळही अर्थिक डबघाईला आले आहे. त्यामुळे उत्पन्न ‌वाढीसाठी नवनवे ...

कोल्हापूर : कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर राज्य शासनाच्या अंगिकृत असलेले एस. टी. महामंडळही अर्थिक डबघाईला आले आहे. त्यामुळे उत्पन्न ‌वाढीसाठी नवनवे प्रयोग करणे क्रमप्राप्त बनले आहे. त्यानुसार कोल्हापूर विभागातर्फे कोल्हापूर दर्शनसह गणपतीपुळे, मालवण, विजयदुर्ग, कुणकेश्वर अशा एक दिवसाच्या ‘पॅकेज टूर’ आयोजित केल्या जाणार आहेत. या सर्व सहली अल्प दरात प्रवाशांकरिता उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

कोरोना महामारीनंतर तीन महिने लाॅकडाऊन आणि त्यानंतर प्रथम जिल्हांतर्गत, त्यानंतर जिल्ह्याबाहेर आणि परराज्यात अशी टप्प्याटप्याने एस. टी.ची वाहतूक सुरु करण्यात आली. या दरम्यान महामंडळाच्या राज्यातील आगारांनी मर्यादीत स्वरूपात मालवाहतुकीचा पर्याय निवडला होता. त्यामध्ये कोल्हापूर विभागातील एस. टी.ची चाके फिरली. त्यानंतर अनलाॅकची प्रक्रिया सुरु झाली आणि पुन्हा नियमितपणे पाचशे ते सातशे बसेस धावू लागल्या आहेत. परंतु, प्रवाशांकडून म्हणावा तसा प्रतिसाद अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे महामंडळाचा संचित तोटा वाढू लागला आहे. रोज कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे महामंडळाच्या उत्पन्न वाढीबरोबरच पर्यटनही वाढावे, याकरिता कोल्हापूर विभागाने ‘पॅकेज टूर’ची संकल्पना आणली आहे. यामध्ये प्रतिमाणसी अल्पदरात कोल्हापूरसह गणपतीपुळे, मालवण, विजयदुर्ग, कुणकेश्वर अशा विविध पर्यटनस्थळांच्या एक दिवसांच्या सहली आयोजित केल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे शनिवार, रविवार अशा सुट्टीच्या कालावधीत सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत या सहलींचे आयोजन करण्यात आले आहे.

चौकट

- कोल्हापूर - जोतीबा, पन्हाळा, कणेरीमठ, करवीर दर्शन ( प्रतिमाणसी दर - ४०५ रुपये)

- कोल्हापूर - जोतीबा, पन्हाळा, नृसिंहवाडी, खिद्रापूर ( ४०५ रुपये)

- कोल्हापूर - रत्नागिरी, गणपतीपुळे दर्शन ( ५४० रु)

- कोल्हापूर - मालवण, देवबाग, तारकर्ली (५४० रु)

कोट

पर्यटनवाढीबरोबर एस. टी.चे उत्पन्न वाढीसाठी कोल्हापूर विभागातून अशाप्रकारच्या एक दिवसीय टूरचे आयोजन केले आहे. अल्पदरात प्रवाशांना ही स्थळे पाहता येणार आहेत.

- अजय पाटील, आगार व्यवस्थापक, मध्यवर्ती बसस्थानक, कोल्हापूर