शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

फक्त ग्रामीण : पोलिसांनी शोधले पश्चिम बंगालच्या मुलीचे बाबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पोलिसांनी एखादे काम मनावर घेतले की ते काय करू शकतात याचे सुखद प्रत्यंतर एका ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : पोलिसांनी एखादे काम मनावर घेतले की ते काय करू शकतात याचे सुखद प्रत्यंतर एका कमी बुध्यांक असलेल्या पश्चिम बंगालमधील मुलीला आला. त्या मुलीच्या ओळखीच्या मुलाने तिला फसवून कोल्हापुरात आणले होते. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व करवीरचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी प्रयत्न करून तिच्या वडिलांचा शोध लावला. सध्या ही मुलगी शासकीय वसतिगृहात असून लॉकडाऊन कमी झाल्यावर तिला वडिलांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. एका वाट चुकलेल्या मुलीला तिच्या वडिलांकडे सुपूर्द करणे हीच आमच्यासाठी आनंदाची बाब आहे व त्यासाठीच सगळी धडपड केल्याची प्रतिक्रिया करवीरचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी व्यक्त केली.

घडले ते असे : ही मुलगी सुमारे १८ वर्षांची आहे. ती फक्त पश्चिम बंगालमधील तिच्या गावाचे नाव सांगते. तिच्या घरी असिफ आलम नावाचा मुलगा येत होता. त्याच्याशी झालेल्या ओळखीतून ती त्याच्याबरोबर घरातून निघून आली. काही दिवस मुंबईत राहिली. तिथे त्यांने मारहाण करून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो या मुलीने उधळून लावला. त्या रागातून या मुलाने या मुलीस कोल्हापुरात आणले आणि सोडून तो पसार झाला. काही दिवसांपूर्वी करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ती पोलिसांना मिळून आली. तिच्याशी संवाद साधल्यावर तिचा बुध्यांक कमी असल्याचे लक्षात आले. वयही निश्चित सांगता येत नव्हते. मतिमंद मुलांच्या शाळेत काम केलेल्या मुख्याध्यापिका स्वाती गोखले यांची मदत घेण्यात आली. त्यांनी सीपीआरकडून तिची तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तिचे वयही समजले. सीपीआरच्या तपासणीत तिचा बुध्यांक कमी असल्याचे स्पष्ट झाले. तिने सांगितलेल्या गावाच्या माहितीवर ती पश्चिम बंगालमधील पुर्लिया जिल्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी पश्चिम बंगाल पोलिसांशी स्वत:हून संपर्क साधला व तिचे वडील अन्वर इब्राहिम शेख यांचा शोध लागला. मुलगी कोल्हापुरात असल्याचे समजल्यावर त्यांचाही जीव भांड्यात पडला.