शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

पाचगावमध्ये पाण्यासाठी धावाधाव

By admin | Updated: July 15, 2017 00:48 IST

पाचगावमध्ये पाण्यासाठी धावाधाव

ज्योती पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कपाचगाव : पाचगावमध्ये पावसाळ्याच्या दिवसात देखील पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. जोरदार पावसाच्या अभावी परिसरातील कूपनलिकेच्या पाणीपातळीत घट झाली आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी खासगी पुरवठ्यावर अवलंबून रहावे लागत आहे.उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्यासाठी लोकांनी खासगी कूपनलिका, विहिरी व टँकरचा आधार घेतलाच; परंतु आता देखील याच गोष्टींचा आधार पाचगावकरांना घ्यावा लागत आहे. पाचगाव हे कोल्हापूर शहरालगत जरी असले तरीसुद्धा पाणीप्रश्न अजूनही सुटलेला नाही. जनावरांना मुबलक पाणी मिळत नसल्याने खासगी कूपनलिका, विहिरींमधून शेतकऱ्यांना दिवसाकाठी हजारो लीटर पाणी उपसा करून सायकल, गाडी व कावड करून आणावे लागत आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नळ पाणीपुरवठा योजनेतून मिळणारे पाणी चार-पाच दिवसांतून एकदा लोकांपर्यंत पोहोचत आहे. त्यावर लोकांची तहान भागत नाही. त्यामुळे लोकांना टँकरचाच आधार घ्यावा लागतो. २००० लिटरच्या टँकरला ३०० रुपये मोजावे लागतात. पाचगावची वाढती लोकसंख्या व कॉलन्यांचे विस्तारीकरण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाला पाण्याचे नियोजन करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. प्रशासनाकडून अद्यापही कायमस्वरूपी पाणीप्रश्न मिटेल, अशी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.पाचगावमधील शेतकरी शिवाजी पौंडकर, संभाजी गाडगीळ, युवराज जाधव यांनी स्वत:च्या विहिरीतून व कूपनलिकेतून लोकांना पाण्याची उपलब्धता करून दिली आहे. गावच्या पााण्याच्या टाकीत विहिरीतील पाणी सोडून गावाची तहान भागविली आहे; परंतु तुटपुंज्या पाण्यावर सर्वांचीच तहान भागत नाही. त्यामुळे पाणीप्रश्नासाठी नेमके लोकांनी विचारायचे कोणाला? हा प्रश्न पाचगावकरांना सतावत आहे.सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची लगबग सुरू आहे. निवडणुकीच्या निमित्ताने नेतेमंडळी पाणीप्रश्न सोडवणुकीचे आश्वासन देतात, टँकरने पाणीपुरवठा करतात. मात्र, निवडणूक झाली की, इथला पाणीप्रश्न सोडविणारे नेते या गावाकडे दुर्लक्ष करतात. पाचगावची तहान मात्र कायम राहते. त्यामुळे पाचगावचा पाणीप्रश्न कधी सुटणार? असा प्रश्न कायमचाच पाचगावकरांच्या पाचवीलाच पुजला आहे.