शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
4
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
5
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
6
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
7
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
8
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
9
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
10
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
11
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
12
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
13
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
14
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
15
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
16
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
17
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
18
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
19
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

खुमासदार ‘हास्यकल्लोळ’मध्ये रसिक दंग

By admin | Updated: December 12, 2014 00:34 IST

‘लोकमत’ दीपोत्सव बंपर ड्रॉ : दीपक देशपांडे यांच्या ‘एकपात्री’ला टाळ्यांच्या कडकडाटाने दाद

कोल्हापूर : परदेशात लॉस एंजिल्सपासून अंदमान-निकोबार या खेडेगावांमध्ये ‘हास्यकल्लोळ’चे कार्यक्रम केले; पण महाराष्ट्रासारखा आनंद तेथे मिळाला नाही, अशा खुमासदार विनोदी शैलीत किस्से सादर करून आज, बुधवारी हास्यसम्राट प्रा. दीपक देशपांडे यांनी रसिकांना पोट धरून हसायला लावले. त्यांच्या नर्मविनोदाला टाळ्या आणि हास्याच्या फवाऱ्यांनी रसिकांनी भरभरून दाद दिली. निमित्त होतं... ‘लोकमत’च्या दीपोत्सव बंपर ड्रॉ कार्यक्रमाचे.कोल्हापुरातील राजाराम कॉलेजमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात बंपर ड्रॉ कार्यक्रमांतर्गत प्रा. देशपांडे यांच्या ‘हास्यकल्लोळ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देशपांडे यांनी, ‘लोकमत’तर्फे असे अनेक कार्यक्रम राज्यभर घेतले जातात. त्या माध्यमातून आमच्यासारख्या कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध होेते, असे सांगून संपूर्ण भारतभर ‘लोकमत’चा दबदबा असल्याचे नमूद केले.त्यांनी आपल्या खुमासदार शैलीतून विनोदी किस्से सादर केले. यात त्यांनी डॉक्टरकडे गेलेल्या पेशंटची दटावणीच्या सुरात होत असलेली विचारपूस, ग्रामीण भागातील गुुरुजी हातात तंबाखू मळत आपल्या खणखणीत आवाजात चौफेरपणे सर्व इयत्तांच्या विद्यार्थ्यांना देत असलेले धडे, महाराष्ट्रातील एस. टी. स्टॅँडवरील सरावलेला कंट्रोलरचा आवाज, न्यूयॉर्कच्या विमानतळावरील आवाजापेक्षा खणखणीत वाटतो, वीटभट्टीसह टॉवेल कारखान्यातील कामगारांची आकाशवाणीच्या निवेदकाकडून घेतली जात असलेली मुलाखत, सोलापुरातील भावाने आपल्या बहिणीला कॉईन बॉक्सवरून फोन करून आळवलेला ‘बोल ताई’ हा सूर, यातून घडणारे गमतीदार किस्से सादर केल्यावर रसिकांनी अक्षरश: टाळ्यांचा पाऊस पडला; तर मराठी-हिंदी सिनेमातील कलाकारांच्या नकलांबरोबर राजकीय नेते शरद पवार, आर. आर. पाटील, विलासराव देशमुख अशा दिग्गज नेत्यांचा हुबेहूब आवाज काढून उपस्थितांना हास्याचे फवारे उडवायला भाग पाडले. हास्याच्या प्रचंड धबधब्यामुळे संपूर्ण सभागृह हास्यमय झाले.या कार्यक्रमाला ‘लोकमत’ परिवारासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)उपस्थितांनाही मिळाली आकर्षक बक्षिसे‘लोकमत’ दीपोत्सव बंपर लकी ड्रॉचा दिमाखदार कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या रसिकांमधूनही लकी ड्रॉ काढण्यात आला. यामध्ये गौरी कुलकर्णी, श्रावणी चौगुले, पूजा हंडे, नीता देशपांडे यांना आकर्षक बक्षिसे मिळाली. त्यांना हास्यसम्राट प्रा. दीपक देशपांडे व ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कोल्हापुरातील राजाराम कॉलेजमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात ‘लोकमत’च्या दीपोत्सव बंपर ड्रॉ कार्यक्रमांतर्गत ‘हास्यकल्लोळ’ कार्यक्रम सादर करताना प्रा. दीपक देशपांडे. यावेळी उपस्थित रसिक.