शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
6
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
7
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
8
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
9
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
10
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
11
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
12
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
13
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
14
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
15
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
16
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
17
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
18
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
19
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
20
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान

सत्तारूढ आघाडी नेत्यांची उद्या ‘गोकूळ’ला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकूळ) गोकूळ शिरगाव येथील दूध प्रकल्पास उद्या, सोमवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकूळ) गोकूळ शिरगाव येथील दूध प्रकल्पास उद्या, सोमवारी सत्तारूढ आघाडीचे नेते भेट देणार आहेत. संघाचे कामकाजासह दूध प्रकल्पाची माहिती घेणार आहेत.

‘गोकूळ’च्या निवडणुकीत विरोधी राजर्षि शाहू शेतकरी आघाडीने २१ पैकी १७ जागा जिंकून सत्तांतर घडवले. सभासदांनी मोठ्या विश्वासाने सत्ता दिल्याने त्याचा वापर दूध उत्पादकांच्या हितासाठी करा, असा आदेश नेत्यांनी संचालक मंडळाला दिला आहे. त्यानुसार काटकसरीचा कारभार संचालक मंडळाने सुरू केला आहे. विश्वास पाटील यांची अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी कामकाजास सुरुवात केली आहे. नेत्यांच्या अथक प्रयत्नानंतर ‘गोकूळ’च्या इतिहासात पहिल्यांदाच सत्तांतर घडवण्यात यश आले. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘गोकूळ’ भेट देण्याचे निमंत्रण अध्यक्ष पाटील यांच्यासह संचालकांनी दिले आहे. त्यानुसार ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर, राजेश पाटील, चंद्रदीप नरके, ए. वाय. पाटील आदी नेते सोमवारी सकाळी अकरा वाजता गोकूळ शिरगाव प्रकल्पाला भेट देणार आहेत.

अनेक नेते पहिल्यांदाच पाऊल ठेवणार

गेली अनेक वर्षे ‘गोकूळ’वर आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांची सत्ता होती. त्यामुळे इतर नेत्यांचा ‘गोकूळ’ दूध संघाशी थेट संपर्क कधी आलाच नाही. त्यामुळे बहुतांशी नेते पहिल्यांदाच ‘गोकूळ’च्या मुख्य कार्यालयात पाऊल ठेवणार आहेत.